21 जून हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस का असतो? |Longest day of the year | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Summer Solstice

Summer Solstice: 21 जून हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस का असतो?

आज 21 जून. जगभरात आजचा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र आजच्या दिवसाचे आणखी एक महत्त्व आहे. आजपासून दक्षिणायनाला प्रारंभ होणार आहे. दरवर्षी 21 जून हा दिवस वर्षातील सर्वांत मोठा दिवस ओळखला जातो. या खगोलीय घटनेला Summer Solstice म्हणून ओळखले जाते. (Summer Solstice 2021 longest day of year)

21 जूनला सर्वांत मोठा दिवस असतो. त्यामुळे आज सूर्य कर्कवृत्तावर असेल आणि दिवस हा सव्वातेरा तासांचा राहिल आणि रात्र पावणे अकरा तासांची असेल.

हेही वाचा: 5,000mAh बॅटरीचा नवीन फोन लॉन्च; किंमत फक्त...

21 जूनला सूर्य अधिकाधिक उत्तरेस असून त्याचे दक्षिणेकडे जाणे अर्थात उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. 21 जूनला उत्तर गोलार्धात सर्वांत मोठा दिवस असतो व रात्र सर्वांत लहान असते. आज दिवस सव्वातेरा, तर रात्र पावणेअकरा तासांची असेल, अशी माहिती विश्वभारती विज्ञान केंद्राचे प्रभाकर दोड यांनी दिली.

हेही वाचा: पाऊस पडला नाही की गरम होतं ना ? घेऊन या स्वस्तात मस्त छोटा एसी

उत्तरायण/दक्षिणायन म्हणजे काय?

दररोज पूर्वेकडे उगवणारा सूर्य आज काहीसा दक्षिणेकडे सरकल्या सारखा वाटत आहे. याचे कारण असे की पृथ्वीच्या अक्षाने तिच्या परिभ्रमण प्रतलाशी केलेला 23.5 अंशाचा कोन हे आहे. त्यामुळे सूर्य कर्कवृत्त ते मकरवृत्तापर्यंत फिरत असल्याचा भास होत असून यालाच उत्तरायण/दक्षिणायन म्हणतात.

21 जूनचं नेमक महत्त्व काय?

अनेक देशांमध्ये 21 जूनचा दिवस हा ऋतुबदलाचा दिवस मानला जातो. मराठी पंचांगांत सुद्धा 21 जूनची नोंद 'वर्षा ऋतू प्रारंभ' अशी केलेली असते.

पश्चिमेतल्या देशांमध्ये 21 जूनच्या दिवशी 'Spring' म्हणजे वसंत ऋतू संपून 'Summer' म्हणजेच उन्हाळा सुरू होतो. हा उन्हाळा 21 वा 22 सप्टेंबरला Autumn Equinox ने संपतो. या दिवशी दिवस आणि रात्र समान तासांचे असतात. यानंतर पश्चिमेकडच्या देशांमध्ये Autumn म्हणजे पानगळीचा मोसम सुरू होतो.

Web Title: Do You Know Why 21 June Will Be The Longest Day Of The Year

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :sciencesun
go to top