esakal | ALERT! एटीएम-क्रेडिट कार्डचा पासवर्ड करु नका सेव्ह, अन्यथा..
sakal

बोलून बातमी शोधा

ALERT! एटीएम-क्रेडिट कार्डचा पासवर्ड करु नका सेव्ह, अन्यथा..

ALERT! एटीएम-क्रेडिट कार्डचा पासवर्ड करु नका सेव्ह, अन्यथा..

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पासवर्ड विसरु नये म्हणून केलेली ही गोष्ट तुमच्या अडचणीत भर घालू शकते.

ऑनलाईनच्या जगात आर्थिक व्यवहारात फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. सायबर चोरट्यांच्या टोळ्या एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे उडवण्यासाठी अनोख्या ट्रिक्सचा वापर करत आहे. या सायबर गुन्हेगारीचा शोध घेणं आणि त्यावर आळा घालण ही गोष्ट एखाद्या लिंकवर क्लिक करण्या इतकी सोपी नाही. त्यामुळे अशा प्रकाराला बळी पडू नये यासाठी आपण स्वत: खबरदारी घेणं गरजेचं आहे. डेबिड कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा एटीएमचा पिन कोड क्रमांक (passwords) सुरक्षित ठेवणे ही काळाची गरज आहे. जर तुम्ही मोबाईल अथवा मेल आयडीवर पासवर्ड सेव्ह करत असाल तर ते तुमच्यासाठी धोक्याच ठरु शकते. अनेकदा एकापेक्षा जास्त एटीएम अथवा डेबिट कार्ड वापरताना सर्वांचा पासवर्ड एकच ठेवला ठेवला जातो. पासवर्ड विसरु नये म्हणून केलेली ही गोष्ट तुमच्या अडचणीत भर घालू शकते. जाणून घेऊयात पासवर्ड मोबाईल अथवा ई-मेलवर सेव्ह करणं किती सुरक्षिततेच्या दृष्टीने किती धोकादायक ठरु शकते यासंदर्भातील माहिती

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेमध्ये भारतीयांच्या व्यवहाराबद्दलच्या वर्तनाची मनोरंजक लक्षणं समोर आली आहेत. भारतामधील तीन पैकी एक व्यक्ती पीसी अथवा मोबाइलवर आपली पर्सनल/गोपनीय माहिती सेव्ह करतो. ही माहिती काही असू शकते, जसे की बँक खाते डिटेल्स, डेबिट कार्ड, एटीएम, क्रेडिट कार्ड पिन, पॅन कार्ड क्रमांक, आधार क्रमांक यासह अनेक माहिती दिसून आली. इतकेच नाही, 11 टक्के भारतीय आपली वैयक्तिक आर्थिक माहिती आपल्या फोन क्रमांकामध्ये सेव्ह करतात. पण तुम्हाला माहित असायला हवं की, आपल्या मोबाईलमधील अॅप संपर्क यादीसह इतर अॅप्सची परमिशन मागतात. या सर्वेक्षण अहवालात असे समोर आले की भारतीय त्यांचे पासवर्ड एक किंवा अधिक कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करतात.

हेही वाचा: 'शिक्षक पर्व'मध्ये PM मोदी करणार संबोधित, मोठ्या घोषणेची शक्यता

देशातील 393 जिल्ह्यात 24 हजार लोकांनी या सर्व्हेमध्ये सहभाग नोंदवला होता. यामध्ये 63 टक्के पुरुष तर 27 टक्के महिलांचा समावेश होता. यामधील 27 टक्केंकडे (8,158) एकापेक्षा जास्त एटीएम आणि डेबिट कार्ड आहेत, ज्याची माहिती घरातील सदस्यांसोबत शेअर केली जात. तर 65 टक्के कर्मचाऱ्यांनी आपली माहिती कुणासोबतही शेअर केली नसल्याचं या सर्व्हेतून समोर आलं आहे. सर्व्हेमधील सात टक्केंनी आपले बँक डिटिल्स अथना बँक, एटीएम डिटेल्स मोबाईलमध्ये सेव्ह केले आहेत. अन्य 15 टक्केंनी आपली माहिती ई-मेल अथवा कंप्यूटरमध्ये सेव्ह केली आहे. सर्व्हेमधील 21 टक्केंनी म्हटलेय की, आम्ही आमची सर्व माहिती लक्षात ठेवतो, ती कुठेही सेव्ह केलेली नाही. 39 टक्के लोकांनी आपली वैयक्तिक माहिती कागदावर/डायरीमध्ये लिहून ठेवली आहे.

हेही वाचा: 'शिक्षक पर्व'मध्ये PM मोदी करणार संबोधित, मोठ्या घोषणेची शक्यता

या सर्वेक्षणात असेही सांगण्यात आलेय की, लोकांमध्ये सायबर गुन्हेगारीबाबात अजून जागृकता करण्याची गरज आहे. आरबीआय आणि इतर बँकानी युजर्सला डिजिटल साक्षरता सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. लोकांना त्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षितपणे ऑनलाइन कशी सुरक्षित ठेवायची कशी? याबाबत जागृकता करणं गरजेचं आहे. आपली वैयक्तिक माहिती इतरांना सांगू नये अथवा शेअर करु नये. बँक खात्याचा तपशील, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड एटीएम पिन, आधार कार्ड किंवा पॅन नंबर आणि इतर माहिती इतर वापरकर्त्यांसमोर उघड न करता सुरक्षितपणे साठवण्यासाठी बिटवर्डन पासवर्ड मॅनेजरसारख्या सुरक्षित सिक्रेट्स स्टोरेजचा वापर केला पाहिजे.

loading image
go to top