मांजरापेक्षा कुत्रा पाचपट प्रेमळ 

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

घरामध्ये कुत्रा व मांजरासारखे प्राणी पाळण्याची हौस असते. कुत्र्याची स्वामिनिष्ठा, इमानदारीबद्दल बरेच बोलले जाते. कुत्राप्रेमींसाठी आणखी एक चांगली बातमी आहे. तुम्ही पाळलेला कुत्रा तुमच्यावर मांजरीपेक्षा पाचपट अधिक प्रेम करतो, असा"प्रेमळ' निष्कर्ष अमेरिकेतील न्यूरोसायंटिस्ट डॉ. पॉल झॅक यांनी काढला आहे. बीबीसी वाहिनीच्या "कॅट्‌स वर्सेस डॉग्ज' या माहितीपटासाठी हे संशोधन झाले. कुत्र्याने आपल्या मालकाला पाहिल्यावर त्याच्या लाळेतील ऑक्‍सिटोसिन नावाच्या "लव्ह हार्मोन'चे प्रमाण वाढत असल्याचे संशोधकांना आढळले.

घरामध्ये कुत्रा व मांजरासारखे प्राणी पाळण्याची हौस असते. कुत्र्याची स्वामिनिष्ठा, इमानदारीबद्दल बरेच बोलले जाते. कुत्राप्रेमींसाठी आणखी एक चांगली बातमी आहे. तुम्ही पाळलेला कुत्रा तुमच्यावर मांजरीपेक्षा पाचपट अधिक प्रेम करतो, असा"प्रेमळ' निष्कर्ष अमेरिकेतील न्यूरोसायंटिस्ट डॉ. पॉल झॅक यांनी काढला आहे. बीबीसी वाहिनीच्या "कॅट्‌स वर्सेस डॉग्ज' या माहितीपटासाठी हे संशोधन झाले. कुत्र्याने आपल्या मालकाला पाहिल्यावर त्याच्या लाळेतील ऑक्‍सिटोसिन नावाच्या "लव्ह हार्मोन'चे प्रमाण वाढत असल्याचे संशोधकांना आढळले. कुत्र्याच्या लाळेतील ऑक्‍सिटोसिनचे प्रमाण मांजरीच्या तुलनेत पाचपट अधिक असल्याने कुत्र्याचे आपल्या मालकावर मांजरीपेक्षा पाचपट अधिक प्रेम असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. कुत्रा आणि त्याचा मालक एकत्र असल्यावर दोघांच्याही लाळेतून ऑक्‍सिटोसिनची निर्मिती होत असल्याचे संशोधकांना याआधीच माहीत होते. डॉ. झॅक यांनी प्रत्येकी दहा कुत्रे व मांजराच्या लाळेचे नमुने त्यांनी मालकाला भेटण्याच्या दहा मिनिटे आधी गोळा केले. भेट झाल्यानंतरही ऑक्‍सिटोसिनचे प्रमाण तपासण्यासाठी सर्व सहभागींच्या लाळेचे नमुने घेतले. या नमुन्यांचे विश्‍लेषण केल्यावर कुत्र्यांच्या लाळेमध्ये ऑक्‍सिटोसिनच्या प्रमाणात 57 टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आले. मांजरांमध्ये 
मात्र हीच वाढ केवळ बारा टक्के नोंदविली गेली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dog five times Loving then cat

टॅग्स