esakal | ‘याहू’ने केलेली 'ती' चूक तुम्ही आज करू नका!
sakal

बोलून बातमी शोधा

Yahoo

नोकिया कंपनीची वीस वर्षांपूर्वीची परिस्थिती अनेक लोकांना आठवत असेल. आज, दुर्दैवाने ‘नोकिया’चे फोन्स कुठेही दिसत नाहीत. अमेरिका, चीनमधल्या अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या आयुष्यातल्या या महत्त्वाच्या क्षेत्रावर प्रभुत्व मिळवले आहे. त्याच वेळी ‘ॲपल’ कंपनीचे आदर्श उदाहरणही लक्षात घेण्यासारखे आहे. या कंपनीने सुरुवात केली ती पर्सनल कॉप्युटर्सद्वारे. (लोकप्रिय मॅकबुक आणि त्याआधीचे अवतार). मात्र, फोन्सच्या माध्यमातून युजर एक्स्पिरिअन्स बदलू शकतो ही दूरदृष्टी कंपनीने दाखवली.

‘याहू’ने केलेली 'ती' चूक तुम्ही आज करू नका!

sakal_logo
By
पीटीआय

नोकिया कंपनीची वीस वर्षांपूर्वीची परिस्थिती अनेक लोकांना आठवत असेल. आज, दुर्दैवाने ‘नोकिया’चे फोन्स कुठेही दिसत नाहीत. अमेरिका, चीनमधल्या अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या आयुष्यातल्या या महत्त्वाच्या क्षेत्रावर प्रभुत्व मिळवले आहे. त्याच वेळी ‘ॲपल’ कंपनीचे आदर्श उदाहरणही लक्षात घेण्यासारखे आहे. या कंपनीने सुरुवात केली ती पर्सनल कॉप्युटर्सद्वारे. (लोकप्रिय मॅकबुक आणि त्याआधीचे अवतार). मात्र, फोन्सच्या माध्यमातून युजर एक्स्पिरिअन्स बदलू शकतो ही दूरदृष्टी कंपनीने दाखवली. ‘टचस्क्रीन’ हा भविष्याचा मार्ग आहे, यावर कंपनीचा विश्वास होता. त्यांनी जगातील सर्वांत उत्तम टचस्क्रीन फोन तयार करण्यासाठी सगळ्या प्रकारची गुंतवणूक केली आणि त्या वेळच्या अनेक कार्यरत कंपन्यांना धक्का दिलाच; परंतु अगदी कॉपोर्रेट जगतात मानाचे स्थान असलेल्या ‘ब्लॅकबेरी’लाही धक्का दिला. स्टीव्ह जॉब्ज यांच्या द्रष्टेपणाने जगभरातले उद्योग, युजरच्या सवयी आणि फोन विकत घेण्याचे पॅटर्न्स या सगळ्यांना हादरा दिला.

अशा प्रकारे बदलांना सामोरे न गेल्याने धक्के बसलेल्या अनेक कंपन्यांची उदाहरणे देता येतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागे पडलेल्या कंपन्यांपैकी ‘याहू’ हे अजून एक उदाहरण. त्यांचे काय झाले याबाबतची ही क्रमवारी आपण बघू या -

 • १९९८ मध्ये याहूला एका तरुण स्टार्टअप कंपनीकडून खरेदीबाबत विचारणा आली. त्या कंपनीने दहा लाख डॉलरना कंपनी विकण्याची तयारी दाखवली होती. मात्र, याहूने ती विकत घेण्यास नकार दिला.
 • २००० मध्ये याहू जगात सर्वांत जास्त मूल्य असलेली कंपनी बनली.
 • २००२ मध्ये याहूला आपली चूक लक्षात आली. त्यांनी ती स्टार्टअप पुन्हा विकत घेण्याचा प्रयत्न केला. याहूने तिला ती कंपनी विकत घेण्यासाठी ३ अब्ज डॉलर देण्याची तयारी दाखवली. (त्यांना चार वर्षांपूर्वी द्यावी लागली असती, त्या रकमेपेक्षा तब्बल तीन हजारपट अधिक). मात्र, त्या कंपनीची पाच अब्ज डॉलरची अपेक्षा होती. याहूने विचार सोडून दिला.
 • २००६ मध्ये याहूला आणखी एक स्टार्टअप विकत घेण्याची संधी आली. हे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे नेटवर्क होते आणि त्यांची अपेक्षा १.१ अब्ज डॉलरची होती. याहूने ऐंशी कोटी डॉलर देण्याची तयारी दाखवली. त्या कंपनीने ही ऑफर धुडकावून लावली.

मोबाईल रिचार्जचे दर वाढणार; एअरटेलचे अध्यक्ष सुनिल मित्तल यांनी दिले संकेत

आजची परिस्थिती...

 • २००० मध्ये सर्वांत जास्त मूल्य असलेली याहू कंपनी धुळीला मिळाली आहे.
 • १९९८ आणि २००२मध्ये याहू जी कंपनी विकत घेण्याचा प्रयत्न करत होती, ती कंपनी आज २५ वर्षांची आहे, जगभरात ती ओळखली जाते आणि तिची उत्पादने वापरली जातात आणि आज जगातल्या सर्वांत मूल्यवान उद्योगांपैकी ती एक आहे. त्या एकेकाळच्या स्टार्टअपचे नाव आहे ‘गुगल.’
 • याहू २००६मध्ये जी कंपनी विकत घेण्याचा प्रयत्न करत होती, तिचा संस्थापक आज जगातला चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत आहे. त्या कंपनीचे नेटवर्क वय किंवा प्रदेश अशा कोणत्याही सीमा न मानता जवळजवळ प्रत्येकाकडून वापरले जाते. ही दुसरी तत्कालीन स्टार्टअप होती ‘फेसबुक.’
 • याहू २०००मध्ये हे सगळ्यांत मोठे सर्च इंजीन होते, जगातली सर्वांत मूल्यवान कंपनी होती; पण त्यांना कालबाह्य व्हायला वेळ लागला नाही. त्याच वेळी गुगलने मात्र अतिशय साधा युजर इंटरफेस आणला, अतिशय परिणामकारक आणि सुयोग्य सर्च रिझल्ट्स दाखवायला सुरुवात केली. इतर स्टार्टअप्सनी नावीन्य दाखवायला सुरुवात केली, जो वेग याहू दाखवू शकली नाही. स्टार्टअप्सशी भागीदारी करण्याची संधी असताना याहूने ती साधली असती, तर याहू बाजारातले प्रभुत्व कायम ठेवू शकली असती.

आणखी वाचा - 'फेक न्यूज' रोखण्यासाठी WhatsAppचं नवं भन्नाट फीचर

स्पर्धेत पुढे राहण्यासाठी तुमची कंपनी स्टार्टअप्सशी कशा प्रकारे भागीदारी करू शकते?

 • सोल्युशन्ससाठी स्टार्टअप्ससमवेत ‘सहकार्य’ करा.
 • उपलब्ध असलेल्या संधी साधणारी सोल्युशन्स तयार करणे तुमच्या कंपनीला शक्य होईलच, असे नाही. नवीन उत्पादने, सेवा विकसित करण्यासाठी पूर्णवेळ काम करणारी संशोधन आणि विकास शाखाही तुमच्याकडे असेलच असे नाही.

या ठिकाणी स्टार्टअप्स भूमिका बजावू शकतात -

 • तुमची कंपनी एखादे आव्हान देऊन स्टार्टअप्सना सहभागाचे आवाहन करू शकते, ज्यात तुम्ही तुम्हाला भेडसावणारी समस्या किंवा तुम्हाला दिसणारी संधी सांगू शकता आणि त्यासाठी तुमच्याबरोबर सहकार्याचे आमंत्रण देऊ शकता.
 • यामुळे तुम्हाला ज्या गोष्टीवर भर द्यायचा आहे त्या संदर्भात सोल्युशन्स तयार करण्यासाठी तुम्ही अनेक स्टार्टअप्सबरोबर भागीदारी करू शकता. परिणामी, नावीन्यासाठी तुम्हाला मोजता येईल असे (टँजिबल) मॉडेल मिळेल.
 • स्टार्टअप्सच्या दृष्टीने हीच गोष्ट व्यवसायाची संधी असेल. संयुक्तपणे तयार केलेले उत्पादन त्या स्टार्टअपचे उत्पन्न वाढवेल आणि तुमची कंपनी ते उत्पादन इतर क्लाएंट्सपर्यंत पोचवण्यासाठी मदत करू शकेल.

कॉर्पोरेट ॲक्सिलेटर

 • ज्या कंपन्यांकडे मोठा ग्राहकवर्ग आहे, त्यांनी स्टार्टअप्सना सहभागी करून घेण्यासाठी कॉर्पोरेट ॲक्सिलेटर प्रोग्रॅम सुरू करणे योग्य.
 • या कॉर्पोरेट ॲक्सिलेटर प्रोग्रॅममध्ये संबंधित स्टार्टअपला जिथे योग्य संधी आहे तिथे त्या कॉर्पोरेट कंपनीचा ग्राहकवर्ग वापरण्यासाठी मदत केली जाते आणि त्याद्वारे वाढण्याची संधी दिली जाते.
 • तुमची कंपनी उत्पन्न शेअर करण्याची व्यवस्था करून (लगेच परिणाम दिसण्यासाठी) या संधीतून पैसे मिळवू शकते किंवा त्या स्टार्टअपमध्ये छोटा हिस्सा खरेदी करू शकते (दीर्घकालीन फायद्यासाठी). ती स्टार्टअप वाढेल तसे तुमच्या हिश्श्याचेही मूल्य वाढेल.

स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक
ज्या कंपन्यांकडे खेळते भांडवल आहे, त्या भविष्याच्या दृष्टीने स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात, त्याचा त्यांना भविष्यात फायदा घेता येईल. उदाहरणार्थ, दुचाकी उद्योगात आपण बघितले आहे, की ‘टीव्हीएस मोटर्स’, ‘बजाज’, ‘फोर्स मोटर्स’, ‘हिरोमोटोकॉर्प’ यांसारख्या मोठ्या कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करत आहेत. ग्राहकवर्ग  इलेक्ट्रिक वाहनांकडे वळेल, तेव्हाच्या स्थितीसाठी त्या सज्ज असतील.

स्टार्टअप विकत घेणे
स्टार्टअप विकत घेण्याने एकाच दगडात दोन पक्षी मारता येतात. या गोष्टीमुळे तुमची कंपनी वाढायला, तिचे अस्तित्व विस्तारायला; उत्पादने, ग्राहकवर्ग इत्यादी वाढायला मदत होते. त्याच वेळी स्टार्टअपचे संस्थापक आणि त्यांच्या सगळ्या टीमला तुमच्या कंपनीत सहभागी करून घेतल्याने तुमच्या कंपनीत नावीन्याची संस्कृती रुजू शकते. यामुळे कंपन्यांना दीर्घकालीन दृष्टीने उद्योजकीय टीम्स तयार करण्यासाठी मदत होते.

 • तुमची कंपनी स्पर्धेत पुढे कशी राहू शकते आणि सध्याच्या सतत बदलणाऱ्या जगात नवीन संधी कशा साधू शकते हे जाणून घेण्यासाठी आणखी विचार या सदरात तुम्ही वाचू शकता.

नावातच सर्वकाही!
कोणतीही स्टार्टअप यशस्वी होण्यामागच्या सगळ्यांत महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे तिचं नाव. नाव ही गोष्ट सगळ्यांत महत्त्वाची- कारण कंपनीच्या ब्रँडिंगची गाडी व्यवस्थितपणे सुरूच होऊ शकणार नाही. तुम्ही तुमच्या प्रस्तावित उद्योगाची यंत्रणा उभारण्यावर जितका वेळ खर्च कराल, तितकाच वेळ त्याच्या नावावर खर्च केला पाहिजे. विशेषतः तुमची स्टार्टअप सेवा देणारी असेल, तर नाव खूप महत्त्वाचं आहे. नावात काय आहे असं शेक्सपिअर म्हणाला असला, तरी स्टार्टअपच्या नावात मात्र खूप काही दडलेलं असतं एवढं मात्र खरं. नाव छोटं पाहिजे, सोपं पाहिजे आणि शिवाय नावीन्यपूर्णही पाहिजे. नावातून सेवा नक्की कशा प्रकारची आहे हे कळलं पाहिजे आणि त्याच वेळी त्यानं काही गोष्टींबाबत उत्सुकताही वाढवली पाहिजे. उदाहरणार्थ, ‘बुकमायशो’, ‘मेकमाय ट्रिप’ ही नावं कंपनी काय करते हे लगेच सांगून टाकतात. नावानं सगळं स्पष्ट व्हायलाच पाहिजे असं काही बंधनसुद्धा नाही. मात्र, त्यानं काही स्पष्ट केलं नाही तर किमान काही उत्सुकता तरी निर्माण केली पाहिजे. उदाहरणार्थ, ‘डन्झो’, ‘स्विगी’. नाव छोटं आणि उच्चारायला सोपं पाहिजे. ते ओठांवर खेळलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे ‘रजिस्टर’ झालं पाहिजे. त्यामुळे स्टार्टअपच्या नावावर नक्की खूप आणि दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊन विचार करणं आवश्यक आहे. अनेकदा पारंपरिक विचारांपेक्षा ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार खूप महत्त्वाचा ठरतो.

Edited By - Prashant Patil

loading image