
नवी दिल्ली - सध्या स्वस्त असलेली मोबाइल सेवा महाग होण्याची शक्यता असल्याचं भारती एअरटेलचे अध्यक्ष, सुनील भारती मित्तल यांनी म्हटलं आहे. 'सध्या ग्राहकांना खूपच कमी दराने डेटा दिला जात आहे, आता ते टेलिकॉम उद्योगासाठी अडचणीचं ठरच आहे. दरमहा 160 रुपयात 16 जीबी डेटा खर्च करणे हे कंपनीला परवडणारे नाहीये. इथून पुढे ग्राहकांना 160 रुपयात दरमहा 1.6 जीबी डेटाच मिळू शकेल आणि दुसरा पर्याय म्हणजे ग्राहकांना पहिल्यापेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. अमेरिका किंवा युरोप सारख्या देशांत या सेवांसाठी 50 ते 60 डॉलर घेतले जातात. त्यामूळे 16 जीबी डेटासाठी 2 डॉलर खूपच कमी आहेत, असंही मित्तल यांनी सांगितलं.
डिजिटल कंन्टेन्ट कन्झम्शन (Digital Content Consumption)चा रेवेन्यू पुढील 6 महिन्यात प्रति वापरकर्ता (ARPU - Average revenue per user) 200 रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. ARPU म्हणजे टेलिकॉम कंपन्याना एका यूजरकडून येणारा एका महिन्याचा रेवेन्यू (महसूल) होय. 30 जून 2020 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत भारती एअरटेलने 157 रुपये एआरपीयू मिळवल्याची माहिती दिली. कंपनीने डिसेंबर 2019 मध्ये दरांचे दर वाढवले होते, त्यानंतर एआरपीयूमध्ये ही वाढ दिसून आली. भारती एन्टरप्रायजेसचे कार्यकारी अखिल गुप्ता यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मित्तल यांनी माहिती दिली.
एआरपीयूमध्ये ठोस वाढ करण्याची तयारी
मित्तल म्हणाले की, देशात कठीण काळातही टेलिकॉम कंपन्यांनी त्यांची सेवा पुरविली आहे. भविष्यात टेलिकॉम कंपन्यांना ऑप्टिकल फायबर आणि पाणबुडीतून टाकल्या जाणाऱ्या केबलसाठी मोठा खर्च करावा लागेल. यामूळे येणाऱ्या काळात टेलिकॉम उद्योग टिकवून ठेवण्यासाठी पुढील 5 ते 6 महिन्यांत एआरपीयूमध्ये मोठी वाढ झालेली दिसेल. यामूळे आता काही दिवसांत रिचार्जच्या किंमती वाढलेल्या दिसतील. सध्या आम्हाला 300 रुपयांची एआरपीयू आवश्यक आहे यासाठी भारती एअरटेल पुढील 6 महिन्यांत 200 रुपयांचा एआरपीयू मिळवण्याचं लक्ष्य ठेवणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.