Car Tips : कारमध्ये लोकल अ‍ॅक्सेसरीज बसवताय? जीवावर बेतू शकते ही चूक

लोकल पार्ट्स बसवल्यामुळे तुमच्या कारची वॉरंटी देखील रद्द होते.
Car tips
Car tipsEsakal

कित्येक वेळा पैसे वाचवण्यासाठी म्हणून लोक कारमध्ये लोकल अ‍ॅक्सेसरीज किंवा पार्ट्स लावतात. कित्येक गॅरेज मालकही पैसे कमावण्याच्या दृष्टीने असे पार्ट्स लावण्याला प्रोत्साहन देतात. तुम्हीदेखील कारमध्ये लोकल पार्ट लावण्याचा विचार करत असाल, तर विचार बदला. कारण असं करणं तुमच्या जीवावर बेतू शकतं.

काही दिवसांपूर्वी जयपूर नॅशनल हायवेवर महिंद्राच्या एक्सयूव्ही ७०० या गाडीमध्ये आग लागली. ही गाडी सहा महिन्यांपूर्वीच विकत घेतली होती. महिंद्राच्या महागड्या गाड्यांपैकी ही एक असल्यामुळे यातील सुरक्षेचा मुद्दा समोर आला. माध्यमे आणि सोशल मीडियामध्ये ही गोष्ट व्हायरल झाली होती.

यानंतर महिंद्राने तातडीने आपली टीम याठिकाणी पाठवत कारची तपासणी केली. यामध्ये असं दिसून आलं की कार मालकाने त्यामध्ये लोकल अ‍ॅक्सेसरीज (Car Tips) बसवल्या होत्या. या बसवताना कारच्या मूळ वायरिंगसोबत छेडछाड करण्यात आली होती. त्यामुळे ही आगीची घटना घडली.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र यातून कारमध्ये लोकल पार्ट्स बसवण्याचे तोटे सगळ्यांसमोर नक्कीच आले. आफ्टरमार्केट अ‍ॅक्सेसरीज बसवण्याचे आणखीही काही तोटे (Aftermarket accessories in car) आहेत, ज्यांमुळे तुमचं भरपूर नुकसान होऊ शकतं.

Car tips
Car Tips : अचानक ब्रेक फेल झाल्यावर काय कराल? या टिप्स वाचवतील तुमचा जीव

टेस्ट-सर्टिफिकेट नाही

लोकल दुकानातून घेतलेल्या पार्ट्स किंवा अ‍ॅक्सेसरीजची योग्य प्रकारे चाचणी करण्यात आलेली नसते. तसेच, यांना कोणत्याही प्रकारचे सेफ्टी सर्टिफिकेट देण्यात आलेले नसते. त्यामुळे, तुमच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो.

कारच्या वॉरंटीला धोका

लोकल अ‍ॅक्सेसरीज बसवताना कारचे ओरिजिनल पार्ट्स किंवा वायरिंगसोबत छेडछाड होऊ शकते. यामुळे तुमच्या कारची वॉरंटी रद्द होऊ शकते. यामुळे थोडेसे पैसे वाचवण्याच्या प्रयत्नात तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

Car tips
Jimny Vs. Thar : कोणती लाईफस्टाईल एसयूव्ही आहे तुमच्यासाठी योग्य? फीचर्स वाचा अन् निर्णय घ्या

क्वालिटी नसते खास

लोकल पार्ट्स किंवा अ‍ॅक्सेसरीज या कंपनीच्या ओरिजिनल पार्ट्सच्या तुलनेत खूपच स्वस्त असतात. मात्र, यासोबतच त्यांची क्वालिटी देखील तेवढीच कमी असते. त्यामुळे भविष्यात वारंवार ते पार्ट बदलण्याची गरज तुम्हाला भासू शकते.

परफॉर्मन्स होतो खराब

खराब क्वालिटी, म्हणजेच खराब परफॉर्मन्स. लोकल पार्ट्स वापरल्यामुळे तुमची कार पहिल्यासारखी राहत नाही. शिवाय, अशा पार्ट्समुळे तुमच्या जीवालाही धोका निर्माण होतो.

Car tips
Electric Cars : भारतातील सर्वात स्वस्त टॉप ५ इलेक्ट्रिक कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com