Gmail Features: आता Email वाचा न उघडता; या आहेत सोप्या ट्रिक्स...

शाळेपासून तर अगदी आपल्या ऑफिसेसपर्यंत सगळीकडेच कामासाठी हे सॉफ्टवेअर वापरलं जातं
Gmail Hidden Features
Gmail Hidden Featuresesakal

Gmail Hidden Features: Gmail हे असं सॉफ्टवेअर आहे जे प्रत्येक जण आपल्या रोजच्या आयुष्यात वापरतात. शाळेपासून तर अगदी आपल्या ऑफिसेसपर्यंत सगळीकडेच कामासाठी हे सॉफ्टवेअर वापरलं जातं. जगभरात १५० दशलक्षाहून अधिक युजर्स Gmail वापरतात अन् अर्थात यात तुमचाही समावेश आहेच. आणि ह्यात जर तुम्हाला याचा काही ट्रिक्स कळल्या तर? खूप वेळ वाचेल नाही?

कॉन्वरसेशन व्ह्यू:

तुम्हाला सर्व ईमेल एकाच थ्रेडमध्ये ठेवायचे असल्यास, तुम्ही "कॉन्वरसेशन व्ह्यू" वापरु शकतात. या फीचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याच्या मदतीने ईमेल आणि त्या मेलवर आलेले सर्व रिप्लाय एकाच वेळी पाहता येतील. कॉन्वरसेशन व्ह्यू सुरु करण्यासाठी, तुम्हाला Gmail च्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल. तिथून, तुम्हाला शेवटी ईमेल थ्रेडिंगसह कॉन्वरसेशन व्ह्यूचा पर्याय मिळेल. ते निवडून, तुम्ही कॉन्वरसेशन व्ह्यूचा ऑप्शन सिलेक्ट करा.

Gmail Hidden Features
Gmail वरील Spam Mail ने हैराण झाला आहात, तर ‘असे’ बंद करा हे मेल

Gmail सर्च:

Gmail २० हून जास्त सर्च ऑपरेटरसोबत येते त्यामुळे तुम्ही इथे आपले मेसेज शोधू शकतो किंवा फिल्टर देखील करु शकतात. या साठी Gmail च्या सर्वात वरच्या लाइन वरती क्लिक करुन तिथून हवं त्या व्यक्तीच नाव टाकून शोधू शकतात.

तुम्ही फिल्टर लावून सुद्धा शोधू शकतात यासाठी तुम्ही सर्च बॉक्सच्या उजवीकडे ड्रॉप-डाउनमधून ऑप्शन निवडा. इथे तुम्हाला एक दिवस ते एक वर्षाचा पर्याय मिळेल. त्याचप्रमाणे, आपण वेगवेगळे फिल्टर सेट करु शकता.

Gmail Hidden Features
Gmail Down: जगभरात जीमेलची सेवा ठप्प, मेल पाठवताना येतेय समस्या; नेटकऱ्यांनी ट्विटरवर मांडली तक्रार

शेड्यूल करा

तुम्हाला Gmail वर मेल शेड्यूल करण्याचं फिचर देखील मिळते. या फिचरच्या मदतीने तुम्ही तुमचा मेल शेड्यूल करु शकता. या फिचरचा फायदा असा आहे की त्यासोबत तुम्हाला नेहमी available असण्याची गरज नाही. जर तुम्हाला सकाळी सहा वाजता ईमेल पाठवायचा असेल, तर तुम्ही वेळ आणि तारखेसह एक दिवस अगोदर ते शेड्यूल करु शकता आणि ठरलेल्या वेळेला आणि तारखेला ईमेल स्वतःहून पाठविला जाईल.

हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, तुम्हाला डाउन एॅरोवर टॅप करावे लागेल आणि शेड्यूल सेंडच्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुम्ही प्रीसेट ऑप्शनवर क्लिक करुन तारीख आणि वेळ निवडू शकता.

Gmail Hidden Features
Gmail : अनावश्यक ईमेल्सना कंटाळला आहात ? असे हटवा नको असलेले ईमेल्स

Undo मेसेज करा:

हे एक अतिशय उपयुक्त आणि अनेक प्रॉब्लेम्सपासून वाचवणारे फिचर आहे. बर्‍याच वेळा आपण घाईघाईने ईमेल पाठवतो आणि तो पाठवताच आपल्याला आठवते की आपण चुकीची फाईल जोडली आहे किंवा मेसेज मध्ये चूक झाली आहे. काहीवेळा घाईत ईमेल चुकीच्या व्यक्तीकडे जातो. अशा परिस्थितीत Gmail चे हे फिचर अतिशय उपयुक्त ठरते. २०१५ पासून, Gmail युजर्सला send वर क्लिक केल्यानंतर त्यांची चूक सुधारण्यासाठी 30 सेकंदांचा वेळ देते. म्हणजेच, आपण मेल पाठवल्यानंतर ३० सेकंदांमध्ये तो undo करुन डिलिट करु शकतो.

यासाठी सेटिंग्जमध्ये जा Undo Send चे time limit वाढवा. यानंतर, जर तुम्ही चुकून मेल पाठवला तर तुम्ही ३० सेकंदात तो पाठवण्यापासून थांबवू शकता. लक्षात ठेवा की तुम्ही ३० सेकंदांनंतर ईमेल पाठवण्यापासून रोखू शकणार नाही.

Gmail Hidden Features
Wrong Gmail Edit: तुमचाही मेल चुकीच्या मेल आयडीवर गेलाय? अशी सुधारा तुमची चूक

प्रिव्ह्यू मेसेज:

Gmail प्रिव्ह्यू मेसेज हे तुमचे ईमेल उघडण्यापूर्वी ते पाहण्याचा एक उपयुक्त पर्याय आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही ईमेल न उघडता वाचू शकता. यामुळे तुमचा बराच वेळ वाचू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com