Wrong Gmail Edit: तुमचाही मेल चुकीच्या मेल आयडीवर गेलाय? अशी सुधारा तुमची चूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wrong Gmail Edit

Wrong Gmail Edit: तुमचाही मेल चुकीच्या मेल आयडीवर गेलाय? अशी सुधारा तुमची चूक

Gmail Use Tricks: सगळी प्रोफेशनल कामे आणि कॉनवर्सेशन हे बहुतांश ईमेलद्वारे होत असतात. एखाद्याचा ईमेल आयडी घेताना शब्द किंवा आकड्याची चूक झाली की तुमचा मेल चुकीच्या व्यक्तीस जाऊ शकतो. ऑफिसच्या वेळेत तुमच्याकडून अशी चुक झाल्यास महत्वाच्या कागदपत्रांचा मेल चुकीच्या मेल आयडीवर केला जाऊ शकतो. तेव्हा या चुका कशा टाळायच्या ते जाणून घ्या.

Send मेल रिकॉल कसा करतात माहितीये?

तुमच्याकडून मेल करण्यात चूक झाली असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. जीमेलकडे तुमच्या चुकीच्या मेलला रिकॉल करण्याची तरतुद आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एक पर्याय अॅक्टिव्ह करण्याची गरज आहे. पर्याय अॅक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही सेंड मेलला ३० सेकंदात रिकॉल करू शकता. त्यापुढच्या सेकंदाला मात्र ही सुविधा उपलब्ध नसेल.

जेव्हाही कुठला मेल पाठवला जातो, तेव्हा तुमच्या स्क्रिनवर डाव्या बाजूला खाली अनडो (Undo) आणि व्ह्यू मॅसेज (View Message) हा पर्याय दिसतो. तुमच्याकडून एखादी चूक झाल्यास Undo या पर्यायावर क्लिक करा. असं करताच सेंड केलेला मेल तुम्ही पुन्हा मेलबॉक्समध्ये घेऊ शकता. तुम्ही हा मेल Cancel सुद्धा करु शकता. यानंतर अपेक्षित बदल करत तुम्ही हाच ईमेल अपेक्षित मेल आयडीवर पाठवू शकता.

हेही वाचा: Gmail वरील Spam Email ने डोकेदुखी वाढवलीय ? 'या' आयडिया वापरा, लगेच होईल काम

बहुतांश मेल आयडीजमध्ये हा पर्याय Active असतो. जाणून घ्या हा पर्याय अॅक्टिव्ह करण्याची पद्धत

आधी तुमचं जीमेल सुरू करा.

जीमेलमध्ये सेटिंग्ज हा पर्याय निवडा.

See all Settings वर क्लिक करा.

जनरल सेटिंग्जमध्ये Undo Send पर्याय दिसेल.

इथे तुम्हाला कॅन्सलेशन पिरेड दिसेल, जिथून 5,10,20,30 सेकंदांपैकी एक पर्याय निवडा असे ऑप्शन्स तुम्हाला दिले जातील.

त्याच पेजच्या सर्वात खाली 'Save changes' नावाचा आणखी एक Option असेल आणि तिथेच क्लिक केलं असता Undo चा पर्याय Active झालेला असेल.