असे करा व्हॉट्सअॅप स्टेटसचे व्हिडिओ डाउनलोड...

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जुलै 2018

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांनी २०१७ मध्ये 'स्टोरी' फिचर लाँच केले. त्यावेळी व्हॉट्सअॅपवर फक्त टेक्सटमध्ये स्टेट्स पोस्ट करता येत असे. त्यानंतर फोटो, व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. आता अनेकजण  व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल साइटवर स्टेट्समध्ये आपला आवडता व्हिडिओ ठेवत असतात. मात्र,आतापर्यंत एखादा व्हिडिओ आवडला तरी सेव्ह करण्याची सोय नव्हती. आता मात्र, व्हॉट्सअॅप स्टेट्सवरील व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहे. 

व्हॉट्स अॅपवर जेव्हा एखादी स्टेट्स दिसते त्यावेळी ती फोनमध्ये डाउनलोड होते. मोबाइलमधील 'statuses' या फोल्डरमध्ये ही स्टोरी जाते. मात्र, ही हिडन फाइल असल्यामुळे फाइल मॅनेजरमध्ये ही फाइल दिसत नाही. त्यासाठी या फोल्डरला अनहाइड करावे लागेल. फोल्डरला अनहाइड करण्यासाठी स्टोरेजमध्ये जाऊन व्हॉट्सअॅप क्लिक करावे. त्यानंतर उजवीकडे सेटिंगवर टॅप करुन 'Show Unhide Files' वर क्लिक करावे. त्यानंतर स्टेट्समधील व्हिडिओ, फोटो सेव्ह करता येणार आहेत.

प्ले स्टोरवर Story Saver for WhatsApp नावाचे अॅप सध्या लोकप्रिय आहे. यामध्ये देखील स्टेटस व्हिडिओ सेव्ह करण्याची सोय आहे. हे अॅप थेट व्हॉट्सअॅपला कनेक्ट होते. त्यानंतर हवी असलेली स्टेट्स स्टोरी डाउनलोड करता येऊ शकते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: download what sap status video