‘अ‍ॅपल’चा डय़ुएल सिम फोन येणार 

वृत्तसंस्था
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

‘अ‍ॅपल’चा डय़ुएल सिम फोन येणार 

मुंबई : अ‍ॅपलचा आयफोन आता डय़ुएल सिममध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कंपनीकडून लवकरच तीन आयफोन, मॅकबुक एअर-२, अ‍ॅपल वॉच-४, एअरपॉड-२, नव्या फेस-आयडी या तंत्रज्ञानासह आयपॅड एकाच वेळी बाजारात आणले जाण्याची शक्यता आहे.

कसे असतील आयफोन?
 कंपनीकडून आणले जाणारे आयफोन ५.८ इंच आयफोन एक्सएस, ६.१ इंच आयफोन एक्ससी, ६.५ इंच आयफोन एक्सएस मॅक्स किंवा प्लस असण्याची शक्यता आहे. शिवाय आयपॅड प्रो १२.९ ची या सालातील नवी आवृत्ती येणार आहे. आयओएस १२ चिपसेटच्यासोबत हे सगळे आयफोन असतील.

या नवीन आयफोनचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अ‍ॅपलची ओळख असलेले फिंगरप्रिंट सेन्सर त्यात नसून त्याजागी फेस आयडी सेन्सर असणार आहे. अ‍ॅपलचे आयफोन पहिल्यांदाच डय़ुएल सिममध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अ‍ॅपलमध्ये असणारे प्रोसेसर आणि रॅम हे आधीच्या आयफोनच्या तुलनेत जास्त क्षमतेचे असतील. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dual-SIM iPhones may become a reality soon