Electric Bus : ‘इझी टू चार्ज’ बसचे अनावरण; इलेक्ट्रिक बसने करा ५०० किमी प्रवास
Auto Expo 2025 : ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने भारत मोबिलिटी ग्लोबल ऑटो एक्स्पोमध्ये नव्या पिढीची इलेक्ट्रिक बस लाँच केली. एकदा चार्ज केल्यावर ही बस ५०० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते, ज्यामुळे मुंबई ते छत्रपती संभाजीनगर, सावंतवाडीपर्यंत आरामदायक प्रवास करता येईल.
नवी दिल्ली : भारत मोबिलिटी ग्लोबल ऑटो एक्स्पोमध्ये आतापर्यंत देश-परदेशातील एकापेक्षा एक कार आणि बाईकचे अनावरण करण्यात आले. ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (ओजीएल)ने नव्या पिढीची इलेक्ट्रिक बस लॉन्च केली आहे.