Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Instagram Influencer Killed: प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल लॅन्डी पार्रागा गोयबुरो (Landy Parraga Goyburo Killed) हिची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये रेस्टॉरंटचे लोकेशन शेअर केल्याने झाली.
Instagram Influencer Killed
Instagram Influencer Killedesakal

Ecuadorian Model- Influencer Killed: इक्वेडोर मध्ये हत्येची एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल लॅन्डी पार्रागा गोयबुरो (Landy Parraga Goyburo Killed) हिची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या तिच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करताना दोन हत्यारधारी लोकांनी केली.

Instagram Influencer Killed
धक्कादायक! खुनाच्या गुन्ह्यातील कैद्यानं चक्क कळंबा कारागृहातून Instagram वर शेअर केली Reel, व्हिडिओतून दिला चिथावणीखोर संदेश

माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोयबुरो हिने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये रेस्टॉरंटचे लोकेशन शेअर केले होते. यामुळे हल्लेखोरांना तिच्यापर्यंत पोहोचणे सोपे झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही पोस्ट व्हायरल झाली होती. पोस्टला 7500 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले होते. पण याच पोस्टमुळे तिला स्वतःचा जीव गमवावा लागला.

Instagram Influencer Killed
Neha Hiremath Murder Case: देशात राजकीय खळबळ उडवणारे नेहा हत्या प्रकरण काय आहे? पंतप्रधान मोदींनीही प्रचारात केला उल्लेख

हल्ल्याचे CCTV फुटेज समोर आले असून त्यामध्ये दोन हत्यारधारी व्यक्ती हॉटेलमध्ये घुसून थेट गोयबुरो हिच्यावर गोळीबार करताना दिसत आहेत. या घटनेदरम्यान काही लोकांनी पळ काढला तर काहींनी जमीनदोस्त होऊन स्वतःचा बचाव केला. परंतु हल्लेखोरांचे लक्ष्य फक्त गोयबुरो हिच्यावरच होते. (Instagram Influencer Killed) त्यांनी जरी हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यात त्यांना यश मिळाले नाही.

Instagram Influencer Killed
Nashik Crime News : पिकअप जीपमधून गांजाची वाहतूक; कथित साधूसह तिघांना अटक

हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हत्येमागे गुन्हेगारी टोळीचा हाथ असल्याची अफवा आहे. या इन्फ्लुएन्सरचे गुन्हेगारांशी तसेच एका ड्रग्ज माफियाशी संबंध असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. याशिवाय तिच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ही होते. मात्र या प्रकरणी तिच्यावर कधीही कारवाई झाली नाही. या हत्येमागे ड्रग्ज कथित माफियाच्या पत्नीचा हाथ असावा असाही संशय व्यक्त केला जात आहे.

Instagram Influencer Killed
Trending News: सबस्क्राईबर्स नाहीत? काळजी नको, YouTube वरुन पैसे तरीही मिळत राहतील; कसे? जाणून घ्या...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com