esakal | पासवर्डशिवाय कनेक्ट करा वायफाय; फॉलो करा 'या' टीप्स
sakal

बोलून बातमी शोधा

free wifi

पासवर्डशिवाय कनेक्ट करा वायफाय; फॉलो करा 'या' टीप्स

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना काळात अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे या काळात प्रत्येकाकडे इंटरनेट असणं अत्यंत गरजेचं आहे. विशेष म्हणजे केवळ ऑफिसचं कामच नव्हे तर दैनंदिन जीवनातील अनेक काम आता आपण इंटरनेटच्या माध्यमातून करु लागलो आहोत. आजकाल प्रत्येकाच्याच फोनमध्ये इंटरनेट असतं. मात्र, मोबाईल नेटचा तुलनेत वायफायचा स्पीड अधिक असतो. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करणारे वायफायला अधिक पसंती देतात. परंतु, वायफाय सुरु करायचा म्हटलं की त्यासाठी पासवर्डचा वापर करावा लागतो. तसंच वायफाय लॅपटॉपला कनेक्ट करायला असेल तर त्यावेळीदेखील पासवर्डची आवश्यकता भासते. आणि, याचवेळी तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर मग खरी पंचाईत होते. मात्र, आता पासवर्डशिवायदेखील आपण लॅपटॉप किंवा अन्य गॅझेटला वायफाय कनेक्ट करु शकतो. (education-career-tech-how-to-connect-wifi-without-password)

लॅपटॉप वायफाय कनेक्ट करायचा असेल आणि तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर काहीच हरकत नाही. आता पासवर्डऐवजी तुम्ही QR कोडच्या माध्यमातूनही वायफाय सहज कनेक्ट करु शकता.

zxing.appspot.com आणि wwW.qrstuff.com या दोन ऑनलाइन संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्ही पासवर्डशिवाय वायफाय कनेक्ट करु शकता. या दोन संकेतस्थळांच्या मदतीने वायफायचं नाव आणि पासवर्ड QR कोडमध्ये बदलता येतो. ज्यामुळे लॅपटॉपला वायफाय कनेक्ट करणं सोपं होतं.

अशा पद्धतीने करा QR कोडचा वापर

सगळ्यात प्रथम zxing.appspot.com आणि wwW.qrstuff.com या दोघांपैकी कोणत्याही एका संकेतस्थळावर जा. तेथे वायफाय नेटवर्क किंवा वायफाय लॉगइन यावर क्लिक करा.

त्यानंतर SSID सेक्शनमध्ये जा आणि तुमच्या वायफायचं नाव टाइप करा. पुढे पासवर्ड टाका आणि नेटवर्क टाइप सिलेक्ट करा.

त्यानंतर जनरेट किंवा डाउनलोड QR कोड यावर क्लिक करा.

QR कोडवर क्लिक केल्यानंतर त्याची प्रिंट काढा आणि फोनवर स्कॅन करा.

हा QR फोनवर स्कॅन झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये वायफाय कनेक्ट होईल आणि त्यानंतर तुम्ही वायफाय डिरेक्टच्या माध्यमातून नेट लॅपटॉपला कनेक्ट करु शकता.

loading image