esakal | relationship: स्त्रियांना सतत वाटते 'या' गोष्टींची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

relationship: स्त्रियांना सतत वाटते 'या' गोष्टींची भीती

relationship: स्त्रियांना सतत वाटते 'या' गोष्टींची भीती

sakal_logo
By
शर्वरी जोशी

आयुष्य जगत असताना प्रत्येकालाच विविध आव्हानांना समोरं जावं लागतं. बऱ्याच वेळा आव्हानं मोठी किंवा कठीण असली की त्याचं सहाजिकच मनावर दडपण येतं. परिणामी, त्यातूनच मग भीती निर्माण होते. आता प्रत्येकाच्या भीतीचं स्वरुप वेगवेगळं असतं. मात्र, अशा काही गोष्टी आहेत ज्यांची भीती स्त्रियांमध्ये सारख्याच स्वरुपाची असते. त्यामुळे समस्त स्त्री वर्गाला सतावणारी ही भीती कोणती ते जाणून घेऊयात. (relationships-these-are-the-fears-of-women)

१. दुर्लक्षित होण्याची भीती -

सध्याच्या काळात दिसणं प्रत्येकासाठीच महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे आपलं व्यक्तिमत्त्व चांगलं दिसावं यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. यामध्येच अनेक स्त्रियांना त्यांच्या दिसण्याबाबत न्युनगंड असतो. जर आपण सुंदर दिसलो नाही तर लोक आपल्याकडे दुर्लक्ष करतील, आपल्याशी बोलणार नाहीत असं त्यांना सतत वाटतं.

हेही वाचा: 'या' ४ गोष्टी करा अन् टाइमपास करणाऱ्या कलिग्सपासून रहा दूर

२. नात्यात वितुष्ट येण्याची भीती -

प्रत्येक स्त्री तिच्या नात्याविषयी अत्यंत पझेसिव्ह असते. त्यामुळे ती सतत आपल्या नातेसंबंधांचा विचार करत असते. मुलांसोबत, पतीसोबत वाद झाले तर ते माझ्यापासून दुरावतील ही भीती तिच्या मनात असते. आपण एकटे पडू असं तिला वाटत असतं.

३. जीवितहानीची भीती -

स्त्रिया त्यांच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याविषयी जरा जास्तच काळजी करत असतात. कोणाला काही तरी होईल या भीतीने त्या कायम इतरांना सल्ला देत असतात. किंवा, घरात एखाद्या व्यक्तीला जरा जरी दुखलं किंवा खुपलं तरीदेखील त्या लगेच घाबरतात.

हेही वाचा: प्रेझेंटेशन देताना चुका होण्याची भीती वाटते?

४. लोकांची मानसिकता -

लोक आपल्याबद्दल काय विचार करतील ही भीती सतत स्त्रियांच्या मनात असते. आपण अमूक कपडे घातले किंवा तमूक स्टाइल कॅरी केली तर लोक काय म्हणतील हा विचार स्त्रियांच्या मनात कायम असतो. त्यामुळे अनेकदा लोकांच्या भीतीमुळे त्या त्यांना हवं तसं जगत नाहीत.

loading image