esakal | पॉवर बँक खरेदी करताय? या काही महत्वाच्या टिप्स
sakal

बोलून बातमी शोधा

पॉवर बँक खरेदी करताय? या काही महत्वाच्या टिप्स

पॉवर बँक कोणती चांगली आहे हे त्याच्या गुणवत्ते वरून लक्षात येते. नवीन पॉवर बँक खरेदी करताना आपण काही गोष्टी नक्कीच लक्षात घेतल्या पाहिजेत.

पॉवर बँक खरेदी करताय? या काही महत्वाच्या टिप्स

sakal_logo
By
अर्चना बनगे

आजकाल तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन शिवाय अशा अनेक वस्तू आहेत. ज्या आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनल्या आहेत. अनेक छोट्या-मोठ्या गोष्टीबाबत आपण यावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ पॉवरबँक जे डिवाइसला चार्ज ठेवते. या माध्यमातून आपण एकमेकांशी कनेक्ट राहतो. कारण जर मोबाईल फोन डिस्चार्ज झाला तर पॉवरबॅंक चा वापर आपण सहजपणे चार्जिंग करू शकतो. आजकाल बाजारपेठेत अनेक पॉवरबँक आलेले आहेत. जे स्वस्तात मिळतात. परंतु ही वस्तू खरेदी करताना आपण त्या वस्तूच्या बरोबरच त्याच्या गुणवत्तेची ही माहिती करून घेणे आवश्यक आहे. यासाठी पॉवरबँक खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जर त्या पॉवरबँक मध्ये फिचर्स चांगले असतील तर ते अधिक काळ चालतात. आपण या ठिकाणी पॉवरबँक खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत याबाबत माहिती करून घेऊया.

किती मोबाईल ला चार्जिंग होऊ शकते

तुम्ही जर पॉवरबॅंक खरेदी करायाला जाताय तर ही गोष्ट लक्षात घ्या की, एकाच वेळी अनेक मोबाईल चार्जिंग करू शकेल. याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. बाजारपेठेत वेगवेगळ्या दर्जाचे पॉवरबँक मिळतात जे वेगवेगळ्या चार्जिंगच्या पोर्ट बरोबर येतात. तुम्ही मोबाईल सोबत टॅब किंवा लॅपटॉप दोन चार्जिंग वाला पोर्ट खरेदी करा.हा बेस्ट पर्याय ठरू शकेल. यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि अनेकांच्या बरोबर या माध्यमातून संपर्कात राहू शकाल.

बॅटरीची क्षमता तपासून पहा

पॉवर बँकमध्ये कमीत कमी स्मार्टफोन एवढी क्षमता आवश्यक असते. तेवढी क्षमता त्याची असावी अथवा त्यापेक्षा अधिक असेल तर उत्तमच. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनच्या बॅटरीचा बॅकअप किती आहे याचीही माहिती असने गरजेचे आहे. जर पॉवरबॅंक च्या बॅटरी चे बॅकअप फोन पेक्षा जादा असेल तर टॅब आणि लॅपटॉप आपण सहजपणे चार्ज करू शकतो. यासाठी जेव्हा पॉवर बँक खरेदी करता त्यावेळी त्याची क्षमता जरूर पहा. याशिवाय ही गोष्ट ही लक्षात ठेवा कि त्याचे पॉवर ऑटो कट असावे. यामुळे पॉवर बँक ओव्हर चार्ज होणार नाही आणि ते जास्त दिवस टिकेल.

ब्रॅडेंड पॉवर बँक खरेदी करा

चांगली गुणवत्ता असलेले ब्रँडेड पॉवर बँक खरेदी करा. ब्रँडेड पॉवर बँक चे फीचर्स आपण सहजपणे तपासून पाहू शकतो. परंतु लोकल फिचर्सची माहिती करून घेणे मुश्कील होते. स्वस्तातील म्हणून आपण लोकल पॉवरबँक खरेदी करतो. ब्रँडेड पॉवर बँक हे आपल्याला वारंटी देतात. खराब झाल्यास आपल्याला रिप्लेस ही मिळते. याच बरोबर एलईडी लाईटच्या माध्यमातून आपण पॉवरबँक ची क्वालिटी ही समजून घेऊ शकतो. एलईडी इंडिकेटरच्या साह्याने बॅटरी ची लेव्हल आणि चार्जिंग स्थिती याबाबत माहिती मिळू शकते. यासाठी पॉवर बँक खरेदी करताना एलईडी इंडिकेटर लाईट पूर्ण लागलेले आहे की नाही हे तपासून पहा.

सेफ्टी ऑप्शनला दुर्लक्ष करू नका

मोबाईल चार्ज करताना आपण सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक स्मार्टफोन युजर्स रात्री झोपताना चार्जिंग करतात. त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. काही पॉवर बँक ओव्हर चार्जिंग झाल्यामुळे फुटू शकतात. यामुळे केवळ आपला मोबाईलच नव्हे तर अन्य दुर्घटना सुद्धा होऊ शकते. यासाठी जेव्हा पॉवर बँक खरेदी करता त्यावेळी उच्च दर्जाच्या ग्रेड लिथियम पॉलिमर बॅटरी असलेले पॉवरबँक खरेदी करा. लिथियम पॉलिमर बॅटरी असणारे पॉवरबँक महाग असतात परंतु ते सुरक्षेच्या दृष्टीने चांगले असतात.

पॉवरबँक ची क्वालिटी चेक करा

पॉवर बँक खरेदी करताना त्याची बिल्ड क्वालिटी जरूर तपासून पहा. चांगल्या क्वालिटीचे पॉवर बँक अधिक वेगाने चार्जिंग करण्याबरोबरच त्या मोबाईलची सुरक्षितता ही चांगली ठेवते. परंतु कमी गुणवत्ताचे पॉवर बँक योग्य पद्धतीने मोबाईल चार्जिंग करत नाही. त्याचबरोबर त्यापासून धोका पोहोचू शकतो. जेव्हा नविन पॉवर बँक खरेदी करण्यासाठी जाता त्यावेळी या गोष्टी अवश्य तपासून पहा.

loading image
go to top