Emotorad : कशी आहे धोनीने जाहिरात केलेली इलेक्ट्रिक सायकल? किती आहे किंमत? जाणून घ्या

Electric Cycle : ई-मोटोरॅड या कंपनीने वेगवेगळ्या रेंजमध्ये इलेक्ट्रिक सायकल लाँच केल्या आहेत. यामध्ये अगदी 25 हजार रुपयांपासून इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध आहेत.
Emotorad Electric Cycle
Emotorad Electric CycleeSakal

MSD Emotorad Electric Cycle : महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. यामध्ये धोनी 'बोले जो कोयल' हे गाणं गाताना दिसत आहे. ही खरंतर इ-मोटोरॅड या इलेक्ट्रिक सायकल बनवणाऱ्या कंपनीची जाहिरात आहे. कशी आहे ही सायकल, याचे फीचर्स काय आहेत आणि किती किंमत आहे याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. ई-मोटोरॅड या कंपनीने वेगवेगळ्या रेंजमध्ये इलेक्ट्रिक सायकल लाँच केल्या आहेत. यामध्ये अगदी 25 हजार रुपयांपासून इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध आहेत.

टी-रेक्स एअर

Emotorad T-Rex Air नावाच्या मॉडेलची किंमत 34,999 रुपयांपासून सुरू होते. यामध्ये तुम्हाला एक रिमूव्हेबल बॅटरी मिळते, जी तुम्ही घरामध्ये नेऊनही चार्ज करू शकता. या बॅटरीला सुमारे 5 वर्षांपर्यंतची वॉरंटी मिळते. याची बॅटरी एका चार्जमध्ये 45+ किलोमीटर जाऊ शकते असा दावा कंपनीने केला आहे. याचा टॉप स्पीड 25 kmph एवढा आहे.

या सायकलची व्हील साईज 29 इंच आहे. यामध्ये 7 गिअर आणि एलसीडी डिस्प्ले मिळतो. यामध्ये स्टील फ्रेम, ड्युअल मेकॅनिकल डिस्क ब्रेक उपलब्ध आहे. ही सायकल मेटॅलिक रेड आणि सनडाऊन येलो अशा दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ही सायकल तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इमोटोरॅडच्या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करू शकता.

Emotorad Electric Cycle
Ola Solo : हा एप्रिल फूल जोक नाही! ओलाने खरंच तयार केली आपोआप चालणारी इलेक्ट्रिक स्कूटर; पाहा व्हिडिओ

एक्स-फॅक्टर रेंज

या कंपनीच्या एक्स-फॅक्टर रेंजमध्ये X1 आणि X2 अशा दोन ई-सायकल उपलब्ध आहेत. यांची किंमत अनुक्रमे 24,999 आणि 27,999 रुपये आहे. या दोन्ही सायकलींची रेंज 35+ किलोमीटर एवढी आहे. यात रिमूव्हेबल बॅटरी, डिस्क ब्रेक आणि स्टील फ्रेम मिळते.

डिझायर रेंजमधील EMX+ या ई-सायकलची किंमत 64,999 रुपयांपासून सुरू होते. यामध्ये देखील रिमूव्हेबल बॅटरी मिळते. याची रेंज तब्बल 80+ किलोमीटर एवढी आहे. याचा टॉप स्पीड 35+ किलोमीटर एवढा आहे. यामध्ये निऑन ग्रीन आणि अ‍ॅक्वा असे दोन कलर ऑप्शन मिळतात. यामध्ये 18.5 इंच अ‍ॅल्युमिनिअम अलॉय फ्रेम मिळते. तसंच यात 21 गिअर्स, मेकॅनिकल डिस्क ब्रेक आणि अ‍ॅडजस्टेबल रिअर सस्पेंशन असे फीचर्स मिळतात.

Emotorad Electric Cycle
Xiaomi SU7 : टेस्लाचं दुकान होणार बंद? श्याओमीने स्वस्तात लाँच केली 700 किलोमीटर रेंजची इलेक्ट्रिक कार; किंमत फक्त..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com