स्वस्तात मस्त इलेक्ट्रीक स्कूटर लाँच! किंमत अन् फिचर्स ऐकून व्हाल चकीत | Electric Scooter Greta Harper ZX Series-I | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric Scooter Greta Harper ZX Series-I
स्वस्तात मस्त इलेक्ट्रीक स्कूटर लाँच! किंमत अन् फिचर्स ऐकून व्हाल चकीत | Electric Scooter Greta Harper ZX Series-I

स्वस्तात मस्त इलेक्ट्रीक स्कूटर लाँच! किंमत अन् फिचर्स ऐकून व्हाल चकीत

Electric Scooter: ग्रेटा इलेक्ट्रिकने (Greta Electric) आज आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Greta Harper ZX Series-I भारतात लाँच केली आहे. या स्कूटरची किंमत 41,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ऑप्शनल बॅटरी आणि चार्जर रेंजसह ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यात आली आहे. ही स्कूटर ग्रीन, जेट ब्लॅक, ग्लॉसी ग्रे, मॅजेस्टिक मॅजेन्टा, ट्रू ब्लू आणि कँडी व्हाईट या सहा रंगांच्या पर्यायांसह बाजारात दाखल करण्यात आली आहे.

एकदा चार्जिंग केल्यावर चालेल 100 किमी-

ही इलेक्ट्रिक स्कूटर इको, सिटी आणि टर्बो या तीन राइडिंग मोडमध्ये सादर करण्यात आली आहे. इको मोडमध्ये पूर्ण चार्ज केल्यावर याची रेंज 100किमी आहे, तथापि, सिटी आणि टर्बो मोडमध्ये त्याची रेंज 80किमी आणि 70किमी आहे.

हेही वाचा: लवकरच Kia भारतात लाँच करणार खास इलेक्ट्रीक कार, पाहा डिटेल्स

वैशिष्ट्ये-

या स्कूटरमध्ये डीआरएल, इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टम, अँटी थेफ्ट अलार्म सिस्टम, एलईडी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्ले, कीलेस स्टार्ट, फाइंड माय व्हेईकल अलार्म, वन यूएसबी पोर्ट (यूएसबी 2.0) सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. स्कूटरला ३ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.

हेही वाचा: Electric Scooters: भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 4 इलेक्ट्रीक स्कूटर्स

बुकिंग-

नवीन स्कूटरची टोकन रक्कम 2000 रुपयांसह बुकिंग सुरू झाली आहे. बुकिंग क्रमांकानुसार स्कूटर 45-75 दिवसांत डिलिव्हरी केली जाईल असे कंपनीनं म्हटलं आहे.

Web Title: Electric Scooter Greta Harper Zx Series I Launched In India Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top