Electric Scooter: हिरो मोटोकॉर्पने लॉंच केली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर; एका चार्जवर धावेल 165 किमी

electric scooter hero vida v1 electric scooter launch price rs 1.45 lakh with 165 km range
electric scooter hero vida v1 electric scooter launch price rs 1.45 lakh with 165 km range

Hero MotoCorp ने आपली मोस्ट अवेटेड इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 लॉन्च केली आहे. कंपनीने याला Vida V1 Pro आणि Vida V1 Plus या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहे. या स्कूटर्स जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आल्या आहेत. दरम्यान या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.45 लाख रुपयापासून सुरू होत आहे.

दरम्यान या स्कूटर्सची भारतीय बाजारपेठेत थेट स्पर्धा ही ओला इलेक्ट्रिक, एथर एनर्जी, टीव्हीएस आयक्यूब आणि बजाज चेतक यांच्याशी होईल. कंपनीचे म्हणणे आहे की ते तिच्या सेगमेंटमध्ये अनेक दमदार फीचर्सनी सुसज्ज आहे.यात टच स्क्रीन डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, कीलेस कंट्रोल आणि अॅलॉय व्हील यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

तीन शहरांमध्ये होणार विक्री

सध्या, Vida V1 Plus ची किंमत 3 शहरांमध्ये 1.45 लाख रुपये असेल आणि Vida V1 Pro ची किंमत 1.59 लाख रुपये आहे. त्यांचे बुकिंग 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. हे 2499 रुपयांची टोकन रकमे भरून बुक करता येईल. स्कूटरची डिलिव्हरी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल. सध्या ही इलेक्ट्रिक स्कूटर दिल्ली, बेंगळुरू आणि जयपूरमध्ये विकली जाईल.

electric scooter hero vida v1 electric scooter launch price rs 1.45 lakh with 165 km range
Moto E32: मोटोरोलाने भारतात लॉंच केला बजेट स्मार्टफोन, किंमत तुमच्या बजेटमध्ये

Hero Vida V1 Pro ची रेंज

Vida V1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 80 kmph आहे. स्कूटरची बॅटरी 1.2 किमी प्रति मिनिट या वेगाने चार्ज होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. IDC नुसार, ही ई-स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 165 किमी पर्यंत धावू शकेल. तसेच ती 3.2 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेग गाठते.

Hero Vida V1 Plus ची रेंज

Hero Vida V1 Plus चा टॉप स्पीड देखील 80 kmph आहे. स्कूटरची बॅटरी 1.2 किमी प्रति मिनिट या वेगाने चार्ज होते. IDC च्या मते, ही ई-स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 143 किलोमीटरपर्यंत चालवता येईल. तर ही स्कूटर 3.2 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेग गाठते.

electric scooter hero vida v1 electric scooter launch price rs 1.45 lakh with 165 km range
Airtel: एअरटेलच्या स्वस्त 5G प्लॅनमुळे वाढलं जिओचे टेन्शन! 'इतकी' असेल किंमत

बॅटरी पूर्णपणे सुरक्षित

Hero MotoCorp या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीबद्दल माहिती दिली आहे की, ती पूर्णपणे सुरक्षित आहे. कंपनीने बॅटरीची कसून चाचणी केली आहे. बॅटरीची चाचणी 2 लाख किलोमीटर, 25 हजार तास, उच्च तापमानावर करण्यात आली आहे. त्याची बॅटरी पडल्यानंतर किंवा आदळल्यानंतरही त्याच क्षमतेने आपले काम करत राहील. तुम्ही स्कूटरमधून बॅटरी काढू शकता आणि सोबत घेऊन जाऊ शकता. हे घर किंवा ऑफिसमध्ये कुठेही चार्ज करता येते. कंपनीने 72 तासांची टेस्ट ड्राइव्ह देखील केली आहे. यात 7 इंची टचस्क्रीन दिली आहे. यात कीलेस कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोल फीचर देखील देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com