
सद्या इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric vehicle) मागणी चांगलीच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई म्हणा किंवा पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती... जसं जसा काळ बदलत चालला तसं तसे बदल होत चालले आहे. आता हे बदल वाहनांसाठीही लागू झाले आहेत. पूर्वी पेट्रोल आणि डिझेल अशा दोनच इंधनावर चालणाऱ्या गाड्या होत्या. मात्र, आता इलेक्ट्रिक गाडीने नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. इलेक्ट्रिक वाहनांमधून प्रदूषण होत नसल्याने अनेकजण इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सकडे (Electric vehicle) वळत आहेत. मात्र, भारतात इलेक्ट्रिक वाहनांना लायसेन्सची (License) गरज आहे का? या प्रश्नाचे उत्तर आपण आज जाणून घेऊ या...
इलेक्ट्रिक गाड्यांना लायसेन्सची गरज नाही. इलेक्ट्रिक म्हणजे बॅटरीवर चालणारी वाहने चालवताना कुठल्याही लायसेन्स, इन्शुरन्स, कागदपत्रे आणि हेल्मेटचीही गरज पडत नाही. मात्र, या मागचं कारण काय? इतर वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांना सूट का? अशा प्रश्नांची उत्तर आम्ही देणार आहोत. कारण, इलेक्ट्रिक वाहनंच वाहतुकीच्या प्रमुख साधनांचे भविष्य असणार आहेत.
पेट्रोल किंवा डिझेलवर चालणारी गाडी चालवत असाल तर हेल्मेट, लायसेन्स (License) आणि महत्त्वाची कागदपत्रे असणे फार गरजेचे असते. हे सर्व तुमच्याकडे नसेल तर ट्रॅफिक पोलिस तुम्हाला पकडतील. मात्र, इलेक्ट्रिक बाईक्स (Electric vehicle) चालवताना या सर्व गोष्टींची गरज भासत नाही. मात्र, स्वतःच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियम नक्की पाळा आणि हेल्मेट घाला.
१९८९ चा मोटार वाहन कायदा
१९८९ चा मोटार वाहन कायद्यानुसार (Law) २५ किलोमीटर प्रतितास किंवा त्यापेक्षा कमी वेग असलेल्या वाहनांना लायसेन्सची गरज भासत नाही. तसेच ज्या वाहनांमध्ये २५० Watts किंवा त्यापेक्षा कमी पॉवरची मोटार लागली असते अशा वाहनांना हा कायदा लागू होत नाही. हे सर्व इलेक्ट्रिक बाईक्समध्येच असते. इलेक्ट्रिक बाईक्सना लायसेन्स आणि इतर कागदपत्रांची गरज पडत नाही. अशा गाड्यांना आरटीओ पासिंगचीही गरज पडत नाही.
अधिक माहितीसाठी सरकारच्या या संकेतस्थळावर क्लिक करा
हाय-स्पीड वाहनांसाठी मात्र कागदपत्र आवश्यक
देशात अशी अनेक वाहने आहेत जी ड्रायव्हिंग लायसेन्स, वाहन नोंदणी (व्हेईकल रजिस्ट्रेशन) आणि विम्याशिवाय चालवता येतात. बाजारात दोन प्रकारच्या इलेक्ट्रिक दुचाकी आहेत. हाय स्पीड आणि लो स्पीड स्कूटर. लो स्पीड कमी पॉवर असलेल्या इलेक्ट्रिक (Electric vehicle) स्कूटर-बाइक ज्यामध्ये २५०W मोटर आणि टॉप-स्पीड २५ किलोमीटर प्रति तासांपेक्षा कमी आहे त्यांना चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसेन्स, वाहन नोंदणी (व्हेईकल रजिस्ट्रेशन) आणि विम्याची आवश्यकता लागत नाही. तर हाय-स्पीड वाहनांसाठी मात्र कागदपत्र आवश्यक आहेत.
ड्रायव्हिंग लायसेन्सची गरज नसलेल्या इलेक्ट्रिक गाड्या
हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश एलएक्स
लोहिया ओमा स्टार ली
ओकिनावा लाइट
अँपिअर रिओ एलिट
डिटेल ईझी प्लस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.