इलेक्‍ट्रॉनिक त्वचा करणार औषधोपचार

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

संशोधकांनी शरीरावर टॅटूसारखी दिसणारी अतिशय पातळ, माहिती साठवून ठेवणारी "इलेक्‍ट्रॉनिक त्वचा' विकसित केली आहे. अमेरिकेतील संशोधकांनी तयार केलेली ही त्वचा व्यक्तीच्या हालचाली, त्याच्या आजारांविषयीची माहिती साठवून ठेवेल व गरज पडल्यास शरीरामध्ये औषधेही सोडेल. या त्वचेचा उपयोग पार्किन्सनसारखा आजार झालेल्या व अजिबात हालचाल करू न शकणाऱ्या रुग्णांना सर्वाधिक होईल, असे संशोधकांनी म्हटले आहे.

""ही त्वचा एक चिकटणारी पट्टी असेल व तिच्याच इलेक्‍ट्रॉनिक उपकरण बसविलेले असेल. तिची लांबी चार व रुंदी दोन सेंटीमीटर असेल व जाडी केवळ 0.003 मिलिमीटर असेल. पट्टी तयार करण्यासाठी ताणता येणाऱ्या नॅनो मेटेरिअलचे थर देण्यात आले असून, त्यातील सेन्सर्स तापमान आणि हालचाली मोजतील, माहिती साठवून ठेवतील व गरज पडल्यास शरीरात औषधे सोडतील,'' अशी माहिती ऑस्टिनमधील टेक्‍सास विद्यापीठातील अभियंता नान्सू लू यांनी दिली. हे संशोधन नेचर नॅनोटेक्‍नॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electronic skin

टॅग्स