Elon Musk : ट्विटरचे मालक पुन्हा झाले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; बर्नार्ड अर्नॉल्टला टाकलं मागे

बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या कंपनीचे शेअर्स खाली कोसळल्यामुळे मस्कने बाजी मारली आहे.
Elon Musk
Elon MuskEsakal

टेस्ला, स्पेसएक्स अशा कंपन्यांचे फाउंडर, आणि ट्विटरचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) हे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. यापूर्वी सर्वात श्रीमंतांच्या यादीत टॉपला असणाऱ्या बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) यांच्या कंपनीचे शेअर्स खाली कोसळल्यामुळे मस्कने बाजी मारली आहे.

ब्लूमबर्गने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. गेल्या वर्षी वाढलेल्या महागाईमुळे टेक इंडस्ट्रीला भरपूर संघर्ष करावा लागला. यामुळे अर्नॉल्ट यांनी मस्कला मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत (world's richest person) पहिले स्थान पटकावले होते.

७४ वर्षीय बिझनेस टायकून असणाऱ्या बर्नार्ड अर्ल्नॉल्ट यांनी LVHM या कंपनीची स्थापना केली होती. लुईस व्हुईटॉन, फेंडी आणि हेन्नेसी असे कित्येक मोठे ब्रँड्स या कंपनीच्या मालकीचे आहेत.

Elon Musk
Twitter Bug : डिलीट केलेले जुने ट्विट पुन्हा येतायत समोर; नवीन बगमुळे यूजर्स चिंतेत

LVHM चे शेअर्स घसरले

ब्लूमबर्गच्या (Bloomberg Billionaire Index) रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये लक्झरी क्षेत्राच्या उलाढालीवर असलेला विश्वास कमी होत चालला आहे. चीनमध्ये अशा वस्तूंची मोठी बाजारपेठ आहे, मात्र कोविड आणि इतर परिस्थितींमुळे चीनच्या बाजारपेठेत आर्थिक वाढ अगदीच मंद झाली आहे.

यामुळे LVMH कंपनीचे शेअर्स एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत सुमारे १० टक्क्यांनी घसरले आहेत. एका पॉइंटला तर हे शेअर्स इतके घसरले होते की बर्नार्ड यांचे एका दिवसात तब्बल ११ बिलियन डॉलर्सचे नुकसान झाले.

Elon Musk
Elon Musk: टेस्ला होणार मेड इन इंडिया? इलॉन मस्क झुकला, अधिकाऱ्यांना पाठवणार मोदींच्या भेटीला

मस्कच्या कमाईत वाढ

दरम्यान, इलॉन मस्कच्या कमाईत मात्र यावर्षी ५५.३ बिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे. मस्कने विकत घेतलेली ट्विटर कंपनी तोट्यात चालली असली, तरी त्याच्या टेस्लाची कमाई दमदार सुरू आहे. मस्कच्या एकूण संपत्तीमध्ये ७१ टक्के वाटा हा टेस्लाचा आहे.

कोणाकडे किती पैसा?

ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्समध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, इलॉन मस्कची एकूण संपत्ती सध्या १९२.३ बिलियन डॉलर्स एवढी आहे. तर, बर्नार्ड अर्नॉल्ट यांची एकूण संपत्ती ही १८६.६ बिलियन डॉलर्स आहे.

Elon Musk
Elon Musk Robot Wives : इलॉन मस्ककडे आहेत रोबोट वाईव्हज्? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com