

Elon Musk Explains Starlink Speed Limits in Ukraine & Restoration
esakal
SpaceX Clarifies Ukraine Starlink Throttling: युक्रेनच्या युद्धभूमीवर मागील एका आठवड्यापासून विस्कळीत झालेली स्टारलिंक (Starlink) आणि स्टारशील्ड (Starshield) ही सॅटेलाइट इंटरनेट सेवा आता पूर्ण वेगाने पूर्ववत करण्यात आली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि संरक्षण मंत्रालयाने या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला आहे. या सेवा सुरळीत झाल्यामुळे युक्रेनचे युद्धभूमीवरील दळणवळण, लॉजिस्टिक्स आणि रशियन ड्रोन हल्ल्यांविरोधातील संरक्षण अधिक मजबूत झाले आहे.