Blue Tick : मस्कच्या कृपेने देवालाही मिळणार ब्लू टिक? Twitter वर वेरिफाइड झाले जीसस क्राइस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Twitter

Blue Tick : मस्कच्या कृपेने देवालाही मिळणार ब्लू टिक? Twitter वर वेरिफाइड झाले जीसस क्राइस्ट

Jesus Christ Gets Blue Tick On Twitter : इलॉन मस्क ट्विटरचे मालक बनले तेव्हापासून ते कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहेत. त्याता आता मस्क ब्लू टिकसाठी ट्वीटर यूजर्सकडून 8 डॉलर्स घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

jesus christ

jesus christ

म्हणजेच, याचा अर्थ ब्लू टिकसाठी नव्हे तर, पैसे भरूनही यूजर्सला ब्लू टिक घेता येणार आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच आता मस्कच्या कृपेने देवालाही ब्लू टिक मिळणार आहे. कारण, ट्वीटरवर येशू ख्रिस्तांच्या अकाउंटसमोर ब्लू टिक लावण्यात आली आहे. ट्वीटरवरील येशू ख्रिस्तांच्या अकाउंटला ब्लू टिक मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

हेही वाचा: 'ब्लू टिक'साठी पैसे आकारण्याच्या ट्विटरच्या निर्णयानंतर कंगना रनौत मैदानात; म्हणाली...

ट्वीटरकडून ब्लू टिक देण्यात आलेल्या येशू ख्रिस्तांचे अकाउंटचे 7 लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, हे बनवाट खाते 2006 पासून ट्विटरवर सक्रीय आहे. एवढेच नव्हे तर, अकाउंटच्या बायोमध्ये 'कारपेंटर, हीलर आणि गॉड' असे लिहिले आहे. तसेच, या प्रोफाइलवर येशू ख्रिस्तांचे विकिपीडिया पेज जोडण्यात आले आहे. या अकाउंटचे ७ लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, आताहे खाते मस्कच्या कृपेने व्हेरिफायपण झाले आहे.

ब्लू टिक मिळवणारी अनेक खाती

दरम्यान, जीसस क्राइस्ट हे एकमेव बनावट खाते नाही ज्याला ब्लू टिक मिळालेले आहे. याशिवाय गेमिंग कॅरेक्टर सुपर मारियो आणि इतर अकाउंटलादेखील पैसे भरून ब्लू टिक देण्यात आली आहे. पैसे देऊन ब्लू टिक देण्याच्या ट्वीटरच्या या धोरणामुळे अनेक यूजर्सने नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येकाला ब्लू टिक मिळाल्यास खरं अकाउंट कोणतं हे समजून घेणे यामुळे अवघड होईल असे यूजर्स म्हणणे आहे.

टॅग्स :TwitterElon Musk