'ब्लू टिक'साठी पैसे आकारण्याच्या ट्विटरच्या निर्णयानंतर कंगना रनौत मैदानात; म्हणाली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut  and Elon Musk

'ब्लू टिक'साठी पैसे आकारण्याच्या ट्विटरच्या निर्णयानंतर कंगना रनौत मैदानात; म्हणाली...

नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटाबद्दल चर्चेत आहे. कंगना सडेतोड भाष्य करण्यासाठी ओळखली जाते. मात्र कंगना अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे ट्रोल देखील होते. मात्र आज तिने ट्विटवरकडून ब्लू टिकसाठी पैसे आकारणीच्या निर्णयावर भाष्य केलं.

हेही वाचा: Eknath Shinde: राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारणार! CM शिंदेंनी केली मोठी घोषणा; म्हणाले...

ट्विटरकडून कंगनाचे ट्विटर हँडल स्थगित करण्यात आलं आहे. ट्विटर इलॉन मस्क यांनी विकत घेतल्यानंतर कंगना ट्विटरवर परतणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. ट्विटरने ब्लू टिकसाठी आता पैसे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरच्या या निर्णयाचं कंगनाने समर्थन केलं आहे. तसेच कंगनाने ट्विटरला सर्वात उत्तम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हटलं आहे.

हेही वाचा: Disha Patani: आधी अभिनय शिक.. अ‍ॅब्स दाखवल्यामुळे दिशा पटानी झाली ट्रोल..

कंगना म्हणाली की, "ट्विटरवर ब्लू टिकसाठी पैसे आकारण्याचा निर्णय चांगला आहे. यामुळे प्लॅटफॉर्म आणखी सुधारण्यास मदत होईल. आपण मोफत वापरत असलेल्या सर्व प्लॅटफॉर्मबद्दल कधी विचार केला आहे का? ते स्वत:ला कसे टिकवून ठेवतात? ते डेटा विकतात, तुमच्यावर प्रभाव पाडतात. हे सर्व प्लॅटफॉर्म तुम्हाला मोफत सुविधा देणार असतील तर मग त्यांना पैसा कसा मिळणार? अशा परिस्थितीत ब्लू टिकसाठी पैसे घेण्याचा ट्विटरचा निर्णय अगदी योग्य आहे. यामुळे युजर्सला डेटा लीक सारख्या समस्यांपासूनही मुक्ती मिळेल आणि एक चांगला अनुभवही मिळेल, असंही कंगनाने म्हटलं.