
Elon Musk : 'पेड ब्लू टिक' नंतर मस्कचा यूजर्सना आणखी एक झटका; 'या' सेवेसाठी द्यावे लागणार पैसे
Elon Musk : पेड ब्लू टिक सबक्रिप्शननंतर मस्कच्या मालकी हक्क असलेल्या ट्विटरने यूजर्सना आणखी एक मोठा झटका दिला आहे. ट्विटरने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये या बदलाची माहिती दिली आहे.
टेक्स्ट मेसेजद्वारे केलेल्या टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठीदेखील शुल्क आकारले जाणार आहे. 20 मार्चनंतर केवळ ट्विटर ब्लू यूजर्सचं टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनची सेवा वापरू शकतील.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ट्विटर अकाउंटच्या सुरक्षिततेसाठी एक आवश्यक टूल आहे. जे Twitter अकाउंटला पासवर्ड व्यतिरिक्त अतिरिक्त सुरक्षा देते. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनमुळे यूजरशिवाय अन्य कुणीही तिराहीत व्यक्ती उकाउंट वापरू शकत नाही.
कंपनीने ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले की, टू-फॅक्टर हे अतिशय लोकप्रिय सुरक्षा टूल आहे. परंतु हॅकर्स फोन नंबर-आधारित टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा गैरवापर करू शकतात. त्यामुळे आजपासून अकाउंटसाठी एसएमएसद्वारे टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन बंद करत असून, याचा लाभ घेण्यासाठी ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन आवश्यक असणार आहे.
नॉन-ट्विटर ब्लू सदस्यांसाठी 30 दिवसांची मुदत
दरम्यान, कंपनीने नॉन-ट्विटर ब्लू सदस्यांना सध्याची टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन डिसेबल करण्यासाठी आणि नव्याने अॅक्टिव्ह करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन डिसेबल केल्यानंतर यूजरचा फोन नंबर त्यांच्या Twitter खात्यावरून आपोआप वेगळा होणार नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी नेमके किती पैसे मोजावे लागणार आहेत याबाबत ट्विटरकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.