
Elon musk SpaceX Mars program : संपूर्ण जगाच्या अंतराळ प्रवासाला नवी दिशा देणाऱ्या स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांनी मंगळावर केवळ 90 दिवसांत पोहोचण्याचा धाडसी प्लॅन सांगितला आहे. आतापर्यंत मंगळावर पोहोचण्यासाठी साधारणतः सहा ते नऊ महिने लागायचे, पण एलन मस्क यांच्या म्हणण्यानुसार, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हा कालावधी मोठ्या प्रमाणावर कमी केला जाऊ शकतो.
स्पेसएक्सच्या स्टारशिप या यानाची नाविन्यपूर्ण रचना आणि प्रोपल्शन सिस्टम हीच या जलद प्रवासाची मुख्य कारणे आहेत. पूर्णपणे इंधन भरलेले स्टारशिप पृथ्वीवरून सुटल्यावर 36,000 किमी प्रतितास या वेगाने मंगळाच्या दिशेने प्रस्थान करेल. पृथ्वी आणि मंगळाच्या कक्षीय स्थानांनुसार, यान साधारणतः 80 ते 100 दिवसांत प्रवास पूर्ण करेल.
स्टारशिपला आणखी वेगाने मंगळावर पाठवण्यासाठी एलन मस्क यांचा आणखी एक महत्त्वाकांक्षी आराखडा आहे. काही तांत्रिक सुधारणा आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास हा प्रवास फक्त 45 दिवसांतही पूर्ण होऊ शकतो, असे ते म्हणतात. या योजनेत ‘ऑर्बिटल रिफ्युएलिंग’चा उपयोग होणार आहे. यासाठी मंगळाच्या प्रवासात मुख्य यानासोबत अतिरिक्त इंधन वाहून नेणारी टँकर्सही पाठवली जातील. यामुळे प्रवासादरम्यान इंधन भरणे शक्य होईल आणि अधिक वेगाने गती करता येईल.
या जलद प्रवासाचे अनेक फायदे आहेत. दीर्घकाळ अंतराळात राहिल्यामुळे होणाऱ्या किरणोत्सर्गाचा धोका कमी होईल, तसेच दीर्घ प्रवासासाठी लागणाऱ्या अन्नसाठ्याचा ताणही कमी होईल. या सोयींमुळे मंगळावर मानवी वसाहत निर्माण करण्याच्या प्रयत्नांना अधिक गती मिळेल.
स्पेसएक्सने नुकतेच स्टारशिप सुपर हेवी च्या सहाव्या विकासात्मक उड्डाणाची यशस्वी चाचणी पूर्ण केली असून, 2025 मध्ये सातव्या उड्डाणासाठी तयारी सुरू आहे. पहिल्या ऑर्बिटल प्रक्षेपणासाठी स्टारशिप सज्ज आहे, आणि यामुळे जागतिक अंतराळ विज्ञान क्षेत्राला एक नवा अध्याय मिळणार आहे.
इलॉन मस्क यांच्या या धाडसी प्रयत्नांमुळे अंतराळ प्रवासाची सीमा ओलांडून मंगळावरील मानवी जीवनाच्या स्वप्नाला आकार येण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.