
हार्दिक पटेलांच्या ट्विटर बायोतून 'कॉंग्रेस' गायब, चर्चांना उधाण
गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी, काँग्रेस (Congress) नेते हार्दिक पटेल आणि पक्ष यांच्यातील मतभेद आता आणखी समोर आले आहेत. गुजरात कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून कॉंग्रेस पक्षाचे नाव काढून टाकले आहे, त्यांनी पक्षाचे नाव हटवल्याने त्यांच्या पक्ष सोडण्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.
हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या कामाची स्तुती करत कॉंग्रेस पक्षावर सार्वजनिक टीका केली होती. पटेल हे मागील काही दिवसांपासून कॉंग्रेस (Congress) च्या नेतृ्त्वाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. या दरम्यान वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत, त्यामुळे पटेल यांची नाराजगी कॉंग्रेसला महाग पडू शकते.
हेही वाचा: नवाब मलिक तुरुंगात पडले, प्रकृती गंभीर; वकिलांची कोर्टात माहिती
हार्दिक काँग्रेसचा हात सोडणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हार्दिकने अयोध्येतील राम मंदिर आणि काश्मिरमधून कलम ३७० हटवल्याचा उल्लेख करत भाजपचे कौतुक केले होते. आता त्याच्या बदललेल्या ट्विटर प्रोफाइलने पुन्हा एकदा नव्या चर्चाना उधाण आले आह. हार्दिक पटेलच्या बायोमध्ये आता काँग्रेस नाही तर त्याऐवजी त्यांनी देशभक्त तसेच सोशल आणि पॉलिटीकल अॅक्टिव्हीस्ट अशी ओळख करून दिली आहे.

हेही वाचा: बँक ऑफ बडोदाची गृहकर्ज, कार लोनवरील व्याजदरात कपात; पाहा नवे दर
Web Title: Hardik Patel Removes Congress Party Name From His Twitter Bio Ahead Of Gujarat Assembly Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..