आम्ही भाजपच्या विरोधात आहोत, म्हणून आमच्या घरावर छापे टाकले जाताहेत; काँग्रेस आमदाराचा गंभीर आरोप

त्यांच्या निवासस्थानांवर ठिकठिकाणी छापे टाकण्यात आल्याचंही काँग्रेस आमदारानं सांगितलं.
Income Tax Raid Ranchi Jharkhand
Income Tax Raid Ranchi Jharkhandesakal
Summary

त्यांच्या निवासस्थानांवर ठिकठिकाणी छापे टाकण्यात आल्याचंही काँग्रेस आमदारानं सांगितलं.

झारखंडमधील रांची (Ranchi Jharkhand) येथील काँग्रेस आमदार (Congress MLA) कुमार जयमंगल सिंह (Kumar Jaimangal Singh) यांच्या घरावर आयकर विभागाकडून छापे (Income Tax Raid) टाकण्यात आले आहेत.

या छापेमारीनंतर जयमंगल सिंह म्हणाले, 'आम्ही भाजपच्या विरोधात आहोत, त्यामुळं इथं छापे टाकले जात आहेत. माझ्याकडं एक कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती एकाही प्राप्तिकर अधिकाऱ्यानं दिलेली नाही. माझ्या नातेवाईकांनाही त्रास दिला जात आहे. भाजपचे बाबुलाल मरांडी, निशिकांत दुबे, एचबी सरमा यांच्या सांगण्यावरून आमच्या घरावर छापेमारी केली जात आहे.'

Income Tax Raid Ranchi Jharkhand
Copyright Act : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचं KGF-2 कनेक्शन; राहुल गांधींसह 'या' नेत्यांवर गुन्हा दाखल

त्यांच्या निवासस्थानांवर ठिकठिकाणी छापे टाकण्यात आल्याचंही काँग्रेस आमदारानं सांगितलं. माझ्या पाटण्यातील घरातून त्यांना काही कागदपत्रं आणि 600 रुपये मिळाले आहेत. मात्र, रांचीतील घराबद्दल अद्याप काहीही माहिती नाही. ते अधिकारी इथंच बसून आहेत आणि आम्हाला जबरदस्तीनं घरात कोंडून ठेवत आहेत, असंही कुमार सिंह यांनी सांगितलं.

Income Tax Raid Ranchi Jharkhand
तुम्ही पहाटेचा शपथविधी केला, ती बेईमानी नव्हती का? शंभूराज देसाईंचा अजितदादांवर घणाघात

दरम्यान, यापूर्वी ईडीनं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना 2 नोव्हेंबर रोजी समन्स बजावले होते. समन्स जारी करताना ईडीनं त्यांना 3 नोव्हेंबरला रांची कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं होतं. यानंतर झारखंडच्या राजकारणात खळबळ उडाली. यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी यूपीए विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com