X Calling Feature : 'एक्स'वर कसं असेल व्हिडिओ अन् ऑडिओ कॉलिंग? पहिली झलक आली समोर; पाहा व्हिडिओ

Elon Musk : एक्सला एक 'एव्हरीथिंग अ‍ॅप' बनवण्याचा इलॉन मस्कचा उद्देश्य आहे.
X Audio Video Calling
X Audio Video CallingeSakal
Updated on

इलॉन मस्कने विकत घेतल्यापासून ट्विटर, म्हणजेच एक्स कंपनीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. एक्सला एक 'एव्हरीथिंग अ‍ॅप' बनवण्याचा मस्कचा उद्देश्य आहे. त्यामुळे यामध्ये आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगचे फीचर देखील देण्यात येणार आहे.

हे फीचर कसे असतील, ऑडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉल यांचे इंटरफेस कशे दिसतील याबाबत काही लीक्स समोर आले आहेत. Swak नावाच्या एक्स हँडलवरून हे लीक्स पोस्ट करण्यात आले आहेत. हे अर्ली प्रीव्ह्यू असून, यामध्ये भविष्यात बदल होण्याची शक्यता असल्याचं स्वाकने म्हटलं आहे.

X Audio Video Calling
X News Headlines : आता 'एक्स'वर दिसणार नाहीत बातम्यांच्या हेडलाईन्स; लाईक्स अन् रिप्लायही लपवता येणार

या फीचर्सवर काम सुरू असल्याची माहिती यापूर्वीच इलॉन मस्कने दिली होती. मात्र, हे कधी लाँच होणार आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. स्वाकने देखील 2024 पूर्वी हे फीचर एक्समध्ये मिळेल की नाही याबाबत कल्पना नसल्याचं म्हटलं आहे.

X Audio Video Calling
Elon Musk on COVID Vaccine : 'कोविड लसीमुळे आली होती रुग्णालयात जायची वेळ', इलॉन मस्कचा खळबळजनक दावा!

एव्हरिथिंग अ‍ॅप

एक्स अ‍ॅपमध्ये इतर अ‍ॅप्सच्या सगळ्याच गोष्टी आणण्याचा विडा इलॉन मस्कने उचलला आहे. यामध्ये लवकरच लिंक्ड इन प्रमाणे जॉब पोस्टिंग करता येणार आहे. तसंच ऑनलाईन शॉपिंगसाठी देखील पर्याय देण्यात येणार आहे. यापूर्वीच एक्सवर दोन तासांचे व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा देऊन मस्कने यूट्यूबचं टेन्शन वाढवलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com