Emergency Alerts : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! धोकादायक परिस्थितीत तुमच्या मोबाईलवर मिळणार अलर्ट, पटकन सुरू करून घ्या ही 1 सेटिंग

India Pakistan War tension Emergency Alert feature in mobile : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोबाईलमध्ये 'आपत्कालीन सूचना' फीचर सुरू ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
Emergency Alerts : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! धोकादायक परिस्थितीत तुमच्या मोबाईलवर मिळणार अलर्ट, पटकन सुरू करून घ्या ही 1 सेटिंग
esakal
Updated on

Emergency Alert feature in mobile : भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे युद्धसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलीकडेच झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. अशा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जता सुरू केली आहे.

आपल्या सुरक्षेसाठी सरकारकडून वेळोवेळी विविध प्रकारचे अलर्ट पाठवले जातात. मात्र, अनेकांना या अलर्टची माहिती मिळत नाही आणि त्यामुळे महत्त्वाचे इशारे दुर्लक्षित होतात. यामागचं एक मोठं कारण म्हणजे मोबाईलमध्ये ‘आपत्कालीन अलर्ट’ (Emergency Alerts) हे फीचर बंद असणं. जर हे फीचर आपल्या मोबाईलमध्ये सुरू नसेल, तर संकटांच्या वेळी सरकारचा अलर्ट तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही.

Emergency Alerts : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! धोकादायक परिस्थितीत तुमच्या मोबाईलवर मिळणार अलर्ट, पटकन सुरू करून घ्या ही 1 सेटिंग
Operation Sindoor Weapon : भारताने "ऑपरेशन सिंदूर"साठी वापरलेली प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम काय आहे?

आपत्कालीन अलर्ट म्हणजे काय?

आपत्कालीन अलर्ट हे सरकारकडून पाठवले जाणारे विशेष प्रकारचे संदेश असतात, जे नैसर्गिक आपत्ती, हवाई हल्ला, क्षेपणास्त्र हल्ला, दहशतवादी हल्ला किंवा इतर गंभीर धोके ओळखल्यावर नागरिकांना सावध करण्यासाठी वापरले जातात. हे अलर्ट तुमच्या फोनवर मोठ्या आवाजात सायरनसह येतात, जे अंदाजे 60 सेकंदांपर्यंत सतत वाजत राहतात.

७ मे रोजी देशभरात मॉक ड्रिल

आज, ७ मे रोजी देशभरात मोठ्या प्रमाणात मॉक ड्रिल होणार असून, या वेळी लाखो स्मार्टफोनवर एकाचवेळी आपत्कालीन अलर्ट येण्याची शक्यता आहे. याचा उद्देश म्हणजे नागरिकांच्या सज्जतेची चाचणी घेणे आणि अलर्ट सिस्टीम योग्य प्रकारे कार्यरत आहे की नाही याची खात्री करणे.

Emergency Alerts : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! धोकादायक परिस्थितीत तुमच्या मोबाईलवर मिळणार अलर्ट, पटकन सुरू करून घ्या ही 1 सेटिंग
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व केलं भारताच्या नारीशक्तीने, कोण आहेत 'या' दोघी महिला अधिकारी? जाणून घ्या

तुमच्या मोबाईलमध्ये ही सेटिंग तपासा

जर तुम्हाला हे अलर्ट वेळेत मिळावे असं वाटत असेल, तर लगेचच तुमच्या मोबाईलमधील सेटिंग सुरू करून घ्या

  1. सेटिंग्स (Settings) अ‍ॅप उघडा.

  2. Safety & Emergency किंवा Security & Location हा पर्याय शोधा. (फोनच्या ब्रँडनुसार नाव थोडं वेगळं असू शकतं.)

  3. Wireless Emergency Alerts किंवा Emergency Alerts वर टॅप करा.

  4. येथे Allow Alerts, Test Alerts, आणि Severe Threats सारखे पर्याय असतील, ते सर्व ‘On’ करा.

युद्धसदृश स्थिती उद्भवल्यास केवळ सैन्यच नव्हे तर सामान्य नागरिकांचीही सज्जता अत्यंत महत्त्वाची ठरते. अशा वेळी आपला स्मार्टफोन केवळ संवादाचे साधन न राहता, जीव वाचवणारे साधन ठरू शकतो. त्यामुळे तत्काळ वरील सेटिंग तपासा आणि आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती माहिती वेळेवर मिळवण्याची खात्री करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com