esakal | दसरा-दिवाळीसाठी आताच करा कारची बुकींग, अन्यथा ५ महिने पाहावी लागेल वाट
sakal

बोलून बातमी शोधा

Car

दसरा-दिवाळीसाठी आताच करा कारची बुकींग, अन्यथा ५ महिने पाहावी लागेल वाट

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : दिवाळी किंवा दसऱ्याला पसंतीची नवीन कार अथवा दुचाकी खरेदी करायची असेल तर त्वरा करा. अन्यथा तुमच्या आनंदावर विरजण पडू शकते. कारण कार निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सेमिकंडक्टरची टंचाई (semiconductor shortage) निर्माण झाली आहे. त्यामुळे नवीन कार घरी येण्यासाठी चार ते पाच महिन्याची प्रतिक्षा करावी लागेल. सध्या कार खरेदीची प्रतिक्षा यादी वाढली आहे. कारच्या उत्पादनातील महत्वाचा घटक असलेल्या ७५ हजार रूपये किंमतीच्या चिपचा तुटवडा असल्याने देशात हाहाकार माजविला आहे.

हेही वाचा: VIDEO : लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर उघडलेल्या बाजाराचा अंदाज घेण्यात कंपन्या अपयशी ठरल्या. महामारीमुळे नागरिक वाहने खरेदी करणार नाहीत, असा अंदाज बांधण्यात आला होता. त्यामुळे कंपन्यांनी सेमिकंडक्टरची मागणीही कमीच केली होती. मात्र, परिस्थिती सामान्य झाल्यानंतर खासगी वाहनाच्या मागणीत अचानकच वाढ झाली. अनपेक्षितपणे मागणी वाढल्याने कंपन्यांची पूर्वतयारी व अंदाजच चुकले. त्यामुळे ग्राहकांची प्रतीक्षा यादीत वाढच होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी सेमीकंडक्टर सर्वात महत्त्वाचे उपकरण आहे. क्रिस्टीलाईज सिलिकॉनवर प्रक्रिया करून सेमीकंडक्टर तयार करण्यात येते. त्याचा वापर वाहनांमध्ये करण्यात येतो. भारतात सेमिकंडक्टरची आयात जपान, चीन, तायवान आणि जर्मनीतून होते.

कार विक्री घटणार -

अमेरिकन राज्यात टेक्सासमध्ये फेब्रुवारी महिन्यात बर्फाचे तुफान आले होते. त्यामुळे तेथील सेमीकंडक्टर उत्पादन करणाऱ्या कंपन्या बंद होत्या. तसेच जपानमध्येही उत्पादन थंडावले होते. त्यात कारची मागणीही अचानक वाढली. विक्रीत २० ते २५ टक्के वाढ झाली. आता कारमध्ये वापरण्यात येणाऱ्या सेमिकंडक्टरची टंचाई जाणवू लागली आहे. काही कंपन्यांनी कारचे उत्पादनही कमी केले आहे.

चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये कार तयार करणाऱ्या कंपन्यांना सेमिकंडक्टरच्या टंचाईचा सामना करावा लागतो आहे. त्याचा वाहन विक्रेत्यांनाही फटका बसत आहे. काही कार उत्पादक कंपन्यांनी उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे दिवाळी अथवा दसऱ्याला कार खरेदी करायची असेल तर आताच कारची बुकिंग करणे सोयीचे आहे.
अनुप पांडे, अध्यक्ष विदर्भ ऑटोमोबाइल्स डीलर्स असोसिएशन.
दुचाकी आणि चार चाकी वाहनांमध्ये सेमिकंडक्टरचा वापर केल्या जातो. त्यामुळे दिवाळी आणि दसऱ्याला दुचाकी अथवा चारचाकी वाहन खरेदी करायची असेल तर आताच बुकिंग करणे योग्य आहे. अन्यथा आवडीच्या वाहनासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
ए.के. गांधी, व्यवस्थापकीय संचालक, गांधी समूह
loading image
go to top