मोबाईल वापराचा अतिरेक हे व्यसनच

भारतात ११२.५ कोटी मोबाईल ग्राहक आहेत आणि सर्वाधिक मोबाईल ग्राहक असणारा देश हा भारत देश आहे. 
Excessive use of mobile is an addiction
Excessive use of mobile is an addictionSakal

जगातील अनेक लोक आजपर्यंत विविध व्यसनांच्या आहारी गेले आहेत. आत्ताच्या काळात दारू, तंबाखू , सिगारेट, हुक्का, अमली पदार्थ याचे सेवन लहान वयातही होताना दिसत आहे आणि मोबाईलचा वापर  ३ ते ८० वयोगट अशा मोठ्या पातळीवर घडताना दिसतोय. हे नक्कीच हानिकारक आहे.

- अश्विनी तांबे

कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा ती गोष्ट घातक ठरायला कारणीभूत होऊ शकतो. मोबाईल व्यक्तीला संपर्क ठेवायला उपयोगी साधन म्हणून वापरायला सुरुवात झाली आणि हळू हळू अद्ययावत होत गेलेल्या मोबाईलमध्ये कॅमेरा, व्हिडिओ, रेडिओ, इंटरनेट या सगळ्या गोष्टी आल्यामुळे हा ‘अद्ययावत फोन’ हातात आल्यावर त्याचा मोबाईल हे एक व्यसन जगाला व्यापून टाकत आहे.

त्याचे होणारे परिणाम जाणवू लागल्यामुळे ‘युनिसेफ’ने देखील शालेय पातळीवर मुलांना मोबाईल वापरायला देऊ नये, असे नियम लागू केले आहेत. ब्रिटनमध्ये  याबाबत अंमलबजावणी केली जात आहे.  युनेस्कोने २०२३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट’मध्ये शाळा, वर्गात फोन वापर बंद करावा, हे सुचवले आहे.

त्यांच्या अभ्यासानुसार विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर मोबाईल विघातक परिणाम घडवतो; तसेच शैक्षणिक प्रगतीत अडथळे निर्माण करतो. भारतात ११२.५ कोटी मोबाईल ग्राहक आहेत आणि सर्वाधिक मोबाईल ग्राहक असणारा देश हा भारत देश आहे.  तसेच इंटरनेट स्वस्त असणारा देशात भारताचा पाचवा क्रमांक लागतो. हे सगळे पाहता मोबाईल आणि इंटरनेटचा  आपल्यावरील विळखा वेळेत आवरणे, हे अत्यंत गरजेचे आहे.

दुष्परिणाम- ताणच ताण 

१) एका अभ्यासानुसार सध्या तरुण पिढीमध्ये वाढलेला सांधेदुखीच्या आजारामागे मोबाईलचा अतिवापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. 

२) १८ वर्षीय  व्यक्तींचे डोक्याचे वजन अंदाजे पाच किलो असते. मोबाईल पाहताना डोके जास्तीत जास्त वाकवले जाते. त्यामुळे मानेवर ताण वाढतो. 

३) अधिककाळ मोबाईल वापरल्यास पाठीच्या कण्यावर परिणाम होतो.

४) इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे डोळ्यावर ताण.

५) मानसिक ताण, ग्रहणशक्ती कमी होणे, व्यक्ती अति-आक्रमक होणे, एकाग्रता जाणे, निद्रानाश, चिडचिडेपणा वाढणे, नैराश्यता तसेच मूड सतत बदलत जाणे, लोकांशी संवाद कमी, आभासी जगात व्यक्ती गुंग होऊन भास होणे.

६) हाताची बोटे बधीर होणे, हातापायाच्या अनियंत्रित हालचाली वाढणे.

काय उपाय करावेत?

१) जेवताना मोबाईल न वापरणे.

२) मुलांनी आणि खरेतर आधी पालकांनी मोबाईल वापरावर नियंत्रण आणावे

३) मूल किमान पाच वर्षांचे होईपर्यत त्याच्या हातात मोबाईल न देणे.

४) तरुणाईच्या हातामध्ये मोबाईल हे खूप खतरनाक बनू पाहत आहे. आपला तरुण मुलगा व मुलगी ‘डेटिंग ॲप’ तर वापरत नाही ना? त्यातून त्याच्या किंवा तिच्या आयुष्यात काही दारुण घटना तर घडत नाहीत ना? यावर पालकांनी लक्ष ठेवावे.

५) काही चूक घडत असल्यास आपल्या मुलाला आपला आधार घ्यावा वाटतो का, याचा विचार पालकांनी आवर्जून करावा. 

पेस ग्रुपमध्ये सहभागी व्हा

मुलांमध्ये व्यसनांबद्दल जागरूकता आणण्याचे काम पेस ग्रुप, पुणे (Prevent Addictions through Children's Education) या संस्थेतर्फे शालेय आणि महाविद्यालयीन स्तरांवर केले जाते. पण ते अधिक मोठ्या प्रमाणावर करायला लोकसहभागाची गरज आहे.  पेस ग्रुपच्या व्यसनविरोधी अभियानात स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हा. संपर्क : ९८५०८८८२९०/ ९८९०६०६९९०

(लेखिका पेस ग्रुपच्या समन्वयक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com