FaceApp ची FBI मार्फत चौकशी करा

टीम ई-सकाळ
Thursday, 18 July 2019

FaceApp चा वापर अनेकांकडून केला जात आहे. या FaceApp च्या माध्यमातून आपण काही वर्षांनंतर कसे दिसू शकतो याचा फोटोच मिळत आहे.

नवी दिल्ली : FaceApp चा वापर अनेकांकडून केला जात आहे. या FaceApp च्या माध्यमातून आपण काही वर्षांनंतर कसे दिसू शकतो याचा फोटोच मिळत आहे. मात्र, आता या अॅपचा संपूर्ण तपास 'फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन' (एफबीआय) आणि 'फेडरल ट्रेड कमिशन'कडून (एफटीसी) केला जावा, अशी मागणी अमेरिकेतील सिनेटचे नेते चक श्यूमर यांनी केली आहे. 

FaceApp च्या माध्यमातून आपण तरुणपणी आणि वृद्धपणात कसे दिसू याचा फोटो उपलब्ध होत आहे. आता या अॅपचा तपास केला जाणार आहे. शमूर यांनी या अॅपबाबत मोठी चिंता व्यक्त केली. यातून अमेरिकेतील नागरिकांचा वैयक्तिक डाटा देशाबाहेर जाण्याची शक्यता असून, या माध्यमातून देशाच्या शक्तीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, या कडून यापूर्वीच करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FaceApp Chuck Schumer asks for FBI investigation