Facebook : फेसबुकमध्ये हजारो कर्मचाऱ्यांना खराब रेटिंग, पुन्हा होणार महागच्छंती?

तंत्रज्ञानाशी निगडीत कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचा सपाटा सुरू
Facebook
Facebook esakal

Facebook : एलोन मस्कने ट्वीटरची सूत्रं जेव्हापासून हाती घेतली, तेव्हापासून तंत्रज्ञानाशी निगडीत कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचा सपाटा सुरू असल्याचे दिसत आहे. हजारो लोकांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर फेसबुकची मालक असणारी ‘मेटा’ कंपनी पुन्हा कर्मचारी कपात करणार आहे.

Facebook
Zen Technologies च्या शेअर्सचा उच्चांक, एका महिन्यात 35% रिटर्न...

मेटा कंपनीने जवळपास ११ हजार जणांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. आपल्या १३ टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले. मेटा कंपनीने आपल्या १८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.

Facebook
Technology Tips : Ola-Ather ला घाम फुटला, हिरो घेऊन येणार इलेक्ट्रिक स्कूटरची नवी रेंज

फायनान्शिअल टाईम्समध्ये दिलेल्या वृत्तानुसार, मेटामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सध्या टांगती तलवार आहे. आता पुन्हा कपातीची चिंता सतावू लागली आहे. येत्या काळात मेटामध्ये ही कर्मचारी कपात दुसऱ्यांदा होणार आहे.

Facebook
Smartphone Hack : फोनची स्क्रीन लॉक तरी पाहू शकाल YouTube व्हिडिओ! अशी करा आयडिया

अलीकडे मेटामध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाचे पुनरावलोकन करण्यात आले. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार सुमारे ७००० कर्मचार्‍यांना त्यांच्या कामगिरीच्या पुनरावलोकनांवर आधारित मेटाने 'सबपार' श्रेणी दिली आहे. शिवाय मेटाने बोनस मेट्रिक देखील बंद केले आहेत. कमी रेटिंग मिळाल्याचा अर्थ असा आहे की मेटामधून अधिक कर्मचाऱ्यांना काढलं जाईल. त्यामुळे पुन्हा एकदा कपातीची शक्यता वर्तवली जात आहे.

Facebook
Travel with Partner : जोडीदारासोबत फिरण्यासाठी ही रोमॅण्टिक ठिकाणे आहेत उत्तम

पण ही कपात केवळ मेटामध्येच नाही, तर अमेरिकेतील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये होत आहे. मेटाने नवीन भरती देखील बंद केली आहे. कंपनीचे मानव संसाधन प्रमुख लॉरी गोलर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ४ महिन्यांचा पगार दिला जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com