Smartphone Hack : फोनची स्क्रीन लॉक तरी पाहू शकाल YouTube व्हिडिओ! अशी करा आयडिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smartphone Hack

Smartphone Hack : फोनची स्क्रीन लॉक तरी पाहू शकाल YouTube व्हिडिओ! अशी करा आयडिया

Smartphone Hack : प्रीमियमशिवाय YouTube व्हिडिओ प्ले करा. पण कसा कराल? तर व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म YouTube जगभरात लोकप्रिय आहे. YouTube त्यांच्या युझर्सच्या सोयीसाठी प्रीमियम सेवा देखील देते. या सेवेमध्ये युझर्स जाहिराती स्किप करून त्यांना हव्या त्या व्हिडिओंचा आनंद घेऊ शकतात.

साधारणपणे यूट्यूब पाहताना बऱ्याच जाहिराती मधेच येत राहतात. परंतु प्रीमियम व्हर्जन मध्ये असं होत नाही. यात तुम्ही कोणत्याही जाहिरातीशिवाय व्हिडिओ पाहू शकता. पण यासाठी YouTube महिन्याला काही चार्जेस आकारतात. YouTube प्रीमियम चार्जेस 129 रुपये आहेत.

पण प्रत्येक युजर्सना YouTube Premium खरेदी करणं शक्य होईलच असं नाही. पण मग यासाठी जास्तीचं टेन्शन घेण्याची सुध्दा गरज नाही. अशा काही टिप्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा आवडता व्हिडिओ YouTube Premium शिवाय बॅकग्राउंडमध्ये प्ले करू शकता आणि त्यासोबत इतर गोष्टी करू शकता.

YouTube वर प्रीमियम न घेता असे पाहा व्हिडिओ...

समजा तुम्हाला सकाळचं YouTube चॅनल पहायचं असेल आणि दुसरीकडे WhatsApp वर चॅट करायचं असेल तर तुम्ही या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करू शकता.

यासाठी सर्वप्रथम तुमचा ब्राउझर ओपन करा आणि youtube.com वर जा.

आता सकाळचे YouTube चॅनल उघडा आणि व्हिडिओ सुरू करा.

यानंतर, ब्राउझर स्क्रीनच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यावर क्लिक करा.

यानंतर, डेस्कटॉप व्हर्जन सुरू करा.

यानंतर व्हिडिओ पुन्हा सुरू करा आणि स्क्रीन मिनिमाईज करा.

आता स्क्रीनच्या वर नोटिफिकेशन पॅनेल स्क्रोल करा, आणि प्ले ऑप्शनवर क्लिक करा.

या स्टेप्सनंतर, तुमचा व्हिडिओ बॅकग्राउंडमध्ये प्ले होत राहील आणि तुम्ही WhatsApp वर चॅट किंवा इतर गोष्टी करू शकाल.

जेव्हा तुम्ही YouTube वरून गाणी ऐकता तेव्हा ही आयडिया तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

भारतात 470 दशलक्ष लोक YouTube पाहतात...

2022 मध्ये 154 दशलक्ष युजर्सने हे अॅप डाउनलोड केलय. YouTube च्या मते, सुमारे 2 अब्ज (2 अब्ज) मंथली युजर्स या अॅपमध्ये लॉग इन करतात. 100 हून अधिक देशांमध्ये दर मिनिटाला 80 पेक्षा जास्त भाषा आणि सुमारे 500 तासांचा कंटेंट YouTube वर अपलोड केला जातो. स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार, युजर्सचा विचार करायचा झाल्यास भारत अव्वल स्थानावर आहे. भारतातील 467 दशलक्ष (47 कोटी) लोक यूट्यूब पाहतात