68 लाख फेसबुक युजर्सचे खासगी फोटो 'लीक'

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नवी दिल्ली - फेसबुकच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. फेसबुकच्या 68 लाख युजर्सच्या खासगी फोटोंचा ऍक्सेस थर्ड पार्टीला मिळाला असल्याची माहिती नुकतिच समोर आली आहे. या फोटोचा गैरवापर झाला की नाही, याबाबत मात्र कोणतिही माहिती मिळालेली नाही. 

कंपनीने दिलेल्या एका वृत्तानुसार, 13 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत फेसबुकशी कनेक्टेड जवळपास 1500 ऍप्सला युजर्सच्या खासगी फोटोंसंबंधी हा अॅक्सेस मिळाला होता. ही चूक आता सुधारण्यात आली आहे. 

थर्ड पार्टी ऍपला टाईमलाइनशिवाय स्टोरीजमध्ये शेअर करण्यात आलेल्या फोटोला हा ऍक्सेस मिळाला होता. यावेळी अपलोड केलेले खासगी फोटो जरी पब्लिकली शेअर केले नसले, तरी त्या फोटोंना सुद्धा शेअर करण्याचा ऍक्सेस थर्ड पार्टीला या दरम्यान मिळाला होता. त्यामुळे या फोटोचा गैरवापर झाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

अशी करा पडताळणी 
लेटेस्ट बगमुळे तुमच्या फोटोजला काही धक्का लागला की नाही. हे तपासण्यासाठी तुम्ही या लिंक वर क्लिक करू शकतात. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फेसबुक अकाउंटवरून लॉग इन करावे लागेल. जर तुमच्या फोटोला काही धक्का लागला असेल तर तुम्हाला काय करावे लागेल, यासंबंधीची माहिती या पेजवर देण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook bug exposed private photos of up to 6.8 million use