Facebook : फेसबुकच्या COO शेरिल सँडबर्ग यांचा राजीनामा

Facebook COO Sheryl Sandberg resigns
Facebook COO Sheryl Sandberg resignsesakal
Summary

फेसबुक कंपनीतील नंबर दोन अधिकाऱ्यानं नुकताच राजीनामा दिलाय.

प्रसिद्ध फेसबुकच्या (Facebook Meta) मूळ कंपनीतील नंबर दोन अधिकाऱ्यानं राजीनामा दिलाय. कंपनीची चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) शेरिल सँडबर्ग (Sheryl Sandberg) 14 वर्षे फेसबुकशी संबंधित होती. स्टार्टअपपासून फेसबुकला एक मोठी सोशल मीडिया कंपनी बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

मात्र, कंपनीच्या काही चुकीच्या निर्णयांवरही त्यांच्याकडं बोट दाखवण्यात आलं होतं. ती 2008 मध्ये कंपनीत सामील झाली होती. फेसबुक सार्वजनिक होण्याच्या चार वर्षांपूर्वी आणि कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) नंतर सर्वात जास्त चर्चेत असलेला चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं. फेसबुकपूर्वी सँडबर्ग यांनी गुगलमध्येही काम केलंय. त्यांच्या जागी जावियर ऑलिव्हन (Javier Olivan) यांची फेसबुकचे नवे सीओओ म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

Facebook COO Sheryl Sandberg resigns
भाजप प्रवेश करण्यापूर्वी हार्दिकचं नवं ट्विट; म्हणाला, मी मोदींचा..

शेरिलनं तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय. 'मी जेव्हा 2008 मध्ये कंपनीत रुजू झालो, तेव्हा मला वाटलं नव्हतं की इतकी वर्षे कंपनीत काम करेन. आता आयुष्याचा नवा अध्याय लिहिण्याची वेळ आलीय. मला भविष्यात समाजासाठी काम करायचं आहे. सोशल मीडियाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, यात आता पूर्वीपेक्षा खूप बदल झालाय. आम्ही बनवलेल्या उत्पादनांचा लोकांवर मोठा प्रभाव पडत आहे. लोकांची गोपनीयता राखणं ही आपली जबाबदारी आहे, त्यामुळं लोकांचं कोणतंही नुकसान होणार नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com