Facebook, Instagram वरुन काढला 22 मिलीयन कंटेंट, Meta ने दिली माहिती; तुमची माहिती तर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Facebook, Instagram

Facebook, Instagram वरुन काढला 22 मिलीयन कंटेंट, Meta ने दिली माहिती; तुमची माहिती तर...

Social Media Content : मेटा ने सांगितले की, डिसेंबर 2022 मध्ये भारतातील Facebook साठी 13 पॉलिसीमध्ये 22.54 दशलक्ष पेक्षा जास्त आणि इंस्टाग्रामसाठी 12 पॉलिसीमध्ये 12.03 दशलक्षाहून अधिक माहिती काढून टाकली आहे.

1 ते 31 डिसेंबर महिन्यात भारतीय तक्रार तंत्राच्या माध्यमातून 764 तक्रारी मिळाल्या अन् कंपनीने त्यापैकी 345 यूजर्सना प्रश्न सोडवण्यासाठी टूल्सही दिले आहेत.

मेटाने आपल्या मासिक अहवालात, IT (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचार संहिता) नियम, 2021 चे पालन करताना म्हटले आहे की, विशिष्ट प्रकारच्या उल्लंघनांसाठी कंटेंटच्या अहवालात काही आधीच निर्धारीत केलेले नियम आहेत. यात आपला डेटा ते डाउलोड करु शकताता, अकाउंट हॅक झाल्याच्या मुद्द्यांना सोडवण्याचे पर्याय इत्यादीचा समावेश आहे.

एकूण 205 रिपोर्ट्सवर कारवाई

मेटाने सांगितलं की, इतर 419 रिपोर्टपैकी जिथे विशेष तपसणी, परिक्षणाची आवश्यकता होती तिथे आम्ही आमच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कंटेंट तपासला आणि एकूण 205 रिपोर्टस वर कारवाई केली. उर्वरीत 214 रिपोर्टसची तपासणी झाली पण कदाचित कारवाई झाली नाही.

इंस्टाग्रामवर मिळाल्या एवढ्या तक्रारी

इंस्टाग्रामवर कंपनीला भारतीय तक्रार यंत्रणेतून 10 हजार 820 तक्रारी मिळाल्या. त्यापैकी 2 हजार 461 केसेसमध्ये युझर्सला समस्या सोडवण्यासाठी टूल्स दिले गेले. इतर 8, 359 तक्रारींवर निरीक्षण करण्याची आवश्यकता असून त्यापैकी 2,926 तक्रारींवर कारवाई केली गेली.

इंस्टाग्रामवर उर्वरीत 5,433 रिपोर्टचं परिक्षण केलं गेलं आहे, पण कदाचित कारवाई झालेली नाही. नवे आयटी नियम 2021 नुसार 50 लाखापेक्षा जास्त युझर्स असलेल्या मोठ्या डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मासिक अनुपालन अहवाल प्रकाशित करावा लागेल.