Facebook, Insta आणि WhatsApp पुन्हा डाऊन

fb insta twitter
fb insta twitter

नवी दिल्ली - सोशल मीडिया अॅप फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅप शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा डाउनव झाले होते. युजर्सला या माध्यमातून मेसेज पाठवणं आणि रिसिव्ह करण्यामध्ये अडचणी येत होत्या. रिपोर्टनुसार, अशा प्रकारची समस्या जगभरातील अनेक देशांमधील युजर्सना आली. आता पुन्हा पुर्ववत अॅप्स सुरु झाली आहेत. महिन्याभरात दुसऱ्यांदा अशा प्रकारे फेसबुरक व्हॉटसअॅप डाऊन झालं आहे. 

फेसबुक, व्हॉटसअॅप वापरताना सतत एरर येत होते. यावेळी युजर्सना Can’t access your Facebook feed today? Instagram photos won’t reload? Whatsapp messages not going through? असे नोटिफिकेशनही दिसत होते. 

इन्स्टाग्रामच्या युजरला “We’re sorry, but something went wrong. Please try again,” असे मेसेज येत होते. फेसबुकवरसुद्धा असाच मेसेज येत होता. लोकांना न्यूज फीड रिफ्रेश करण्यामध्ये अडचण येत होती. फीड रिफ्रेश होत नव्हते. 

फेसबुक, इन्स्टा डाऊन झाल्यानंतर ट्विटरवर मीम्स व्हायरल झाले. यामध्ये पुन्हा एकदा ही अॅप्स डाऊन झाल्यानं ट्विटर युजर्सनी खिल्ली उडवणारे मीम्स शेअर केले आहेत. यात ट्विटर युजर्सना आनंद झाल्याचं सांगणारे ट्विटही आहेत. 

याआधी 20 मार्चला जगभरात फेसबुक, व्हॉटसअॅप आणि इन्स्टाग्राम ४२ मिनिटांसाठी डाऊन झालं होतं. युजर्सना ही अॅप्स वापरता आली नव्हतीत. फेसबुकच्या मेसेंजर सर्विसमध्येही एरर येत होते. 20 मार्चला रात्री 11 वाजून 05 मिनिटांनी युजर्सना अडचण यायला लागली. त्यानंतर जवळपास 11 वाजून 47 मिनिटांपर्यंत अॅप्स बंदच होते. यानंतर रात्री उशिरा व्हॉटसअॅप सुरु झालं. त्यानंतर कंपनीकडून युजर्सना याची माहिती देण्यात आली आणि आभारही मानण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com