फेक अकाउंट रोखण्यासाठी फेसबुकचे 'फेस रिकग्निशन' फिचर

बुधवार, 11 एप्रिल 2018

डेेटाची गोपनियता राखली जावी म्हणून फेसबुकने 'फेस रिकग्निशन' हे नवे फिचर आणले आहे.

डेटा गैरवापर प्रकरणानंतर फेसबुक चांगलेच गोत्यात आले. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना युजर्सची नाराजी आणि कायद्याची टांगती तलवार या दोहोंचा सामना करावा लागला. फेसबुक च्या 8.70 कोटी युजर्सचा डेटा चोरीला गेल्याचे कबुल करत जाहीरपणे झुकेरबर्ग यांनी माफी मागितली होती. काल तर फेसबुक मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले झुकेरबर्ग यांची अमेरिकन काँग्रेससमोर सुनावणीही झाली. 

आता फेसबुक टिमकडून दुरावलेले युजर्स परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणजे फेसबुक काही नवे फिचर्स युजर्सना उपलब्ध करुन देत आहे. जेणेकरुन युजर्सच्या डेटाची सुरक्षितता आणि गोपनियता राखली जाऊन त्यांचा विश्वासही पुन्हा मिळवता येईल. असेच एक फेसबुकने उपलब्ध करुन दिलेले फिचर म्हणजे 'फेस रिकग्निशन' (चेहरा ओळख). 

काय आहे 'फेस रिकग्निशन' फिचर?
फेसबुक टिमकडून या नव्या फिचर बाबत युजर्सना तसा तपशीलवार मॅसेजही पाठवण्यात येत आहे. ज्यात लिहीले आहे की, फेसबुक तुम्हाला चांगली सेवा पुरवावी यासाठी प्रयत्नशील आहे'. 'फेस रिकग्निशन' मुख्यतः तीन गोष्टीवर भर देईल. त्या म्हणजे...

  • तुम्ही ज्या फोटोत आहात पण तुम्हाला त्या फोटोत टॅग केलेले नाही असे फोटो शोधता येतील. 
  •  तुमचे फोटो कुणी अनोळखी व्यक्तीने वापरु नये यासाठी ही सुरक्षा असेल. 
  • दृष्टी कमजोर असलेल्या लोकांनाही त्यांच्या फोटो/व्हिडीओमध्ये कोण आहे ते या फिचरद्वारे समजु शकते.

हे नवे 'फेस रिकग्निशन' फिचर तुम्ही स्वतः कंट्रोल करु शकता. या फिचरची सेटींग ही सुरु करण्यात आली आहे. पण आपल्याला ही सेंटींग नको असल्यास ही सेटींग तुम्ही कधीही ऑफ करु शकता. ही सेटींग तुम्ही नंतरही सुरु करु शकता. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook introduces new feature called Face Recognition