esakal | आता Facebook वर शोधा पार्टनर, असे असतील नियम
sakal

बोलून बातमी शोधा

Facebook

आता Facebook वर शोधा पार्टनर, असे असतील नियम

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी फेसबुक आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर घेऊन येत आहे, हे फीचर तुम्हाला पार्टनर शोधण्यात मदत करेल. फेसबुक नवीन स्पीड व्हिडिओ डेटिंग अ‍ॅप लॉन्च करण्याची तयारी करत आहे आणि सध्या तो चाचणीच्या टप्प्यात आहे. या डेटींग अ‍ॅपचे नाव स्पार्क्ड Sparked असे ठेवण्यात आले आहे. मात्र हे वापरण्यासाठी वापरकर्त्यांनी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत.आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

या अ‍ॅपचे वेबपेज लहान कालावधीसाठी लाईव्ह करण्यात आले होते, ज्यात वापरकर्त्यांना फेसबुक खाते वापरुन स्वत:चे नाव रजिस्टर करायचे होते. हे अ‍ॅप फेसबुकच्या एनपीई (New Produt Experiment) टीमने विकसित केले आहे. ही फेसबुक सेवा विनामूल्य देण्यात येणार आहे. अद्याप याच्या लॉन्च संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

पहिला व्हिडिओ तयार करावा लागेल

द व्हर्जच्या अहवालानुसार तुम्हाला चार मिनिटांचा व्हिडिओ तयार करावा लागेल. यानंतर, जर दोन्ही वापरकर्ते पुन्हा व्हिडिओ डेटवर आले तर दुसर्‍या व्हिडिओची डेट 10 मिनिटे असेल. यानंतर, जर दोन्ही वापरकर्त्यांनी पुढे एकमेकांशी बोलू इच्छित असाल तर ते इतर प्लॅटफॉर्म देखील वापरू शकतील.

फेसबुकने हे नियम तयार केले आहेत

स्पार्क्ड वर साइन अप करण्यापूर्वी वापरकर्त्यांना काही नियम पाळावे लागतील. त्यामध्ये महत्वाता नियम एकमेकांचा आदर करणे हा आहे. स्पार्क्ड येथे साइन अप करताना त्यासाठी Kindness हा शब्द वापरला गेला आहे. हे अ‍ॅप वापरताना तुम्ही एकमेकांशी प्रेमाणे वागणे आपेक्षीत आहे.

वापरकर्त्यांना हे प्रश्न विचारले जातील

साइन-अप दरम्यान, वापरकर्त्यांना त्यांच्यातील कोणते गुण त्यांना चांगला डेटर बनवतात हे विचारले जाईल. त्यानंतर स्पार्क्डच्या एका टीमद्वारे तुमच्या प्रोफाइलचे समीक्षा केले जाईल. या प्लॅटफॉर्मवर ट्रान्स जेंडर व्यक्तीला डेट करण्याचा पर्याय देखील असेल.