आता फेसबुकवरूनही कमवा पैसे

Facebook money short videos
Facebook money short videos
Updated on

कोल्हापूर - सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवरील राजा अशी ओळख असलेले फेसबूक प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्याचे मनोरंजणाचे आणि माहिती मिळविण्याचे साधण बनले आहे. परंतु, हेच मनोरंजणाचे साधण जर तुम्हाला पैसे मिळवून देणार असेल तर भारीच होईल ना. तर हो तुम्ही आता फेसबुकवरूनही पैसे कमवू शकता. 

फेसबुकने आता एक नवा पर्याय आणला आहे. फेसबुकवर व्हिडिओ बनविणारे लोक आता जाहिरातींच्या माध्यमातून कमाई करू शकतील. नुकतीत फेसबूकने याबाबत माहिती दिली आहे.  फेसबूकने सांगितल्याप्रमाणे तुम्ही पेसबूकवर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. 

फेसबूकने दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफाॅर्मवर व्हिडिओ बनवणारे लोक एक मिनिटापर्यंतचा व्हिडिओ तयार करून पैसे कमवू शकतात. यावर तीस सेकंदापर्यंतची जाहिरात चालेल. जर तुम्ही तीन मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त मिनिटाचा व्हिडिओ बनवला तर त्यावर 45 सेकंदाची जाहिरात दाखविली जाईल. 

 फक्त याच व्हिडिओला मिळणार पैसे
यामध्ये महत्वाची बाब ही आहे की केवळ याच व्हिडिओला पैस मिळतील ज्या व्हिडिओ वर जाहीरात वापरकर्त्यांनी 6,00,000 मिनिटापर्यंत पाहिली असेल. शिवाय त्या खात्यावर  पाच किंवा त्यापेक्षा जास्त अॅक्टिव्ह व्हिडिओ अपलोड झाले आहेत. त्याबरोबरच पहिले फक्त तीन मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त वेळांच्या व्हिडिओवरील जाहिरातींमधूनच पैसे मिळविता येतील. ज्यामध्ये जाहिरात एक मिनिट आधी दाखवली जात नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.