ईर्षेतून केल्या जातात फेसबुक पोस्ट! 

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

फेसबुक यूजर्स त्यांना भावलेल्या, दुसऱ्यांना सांगाव्या वाटतात अशा अनेक पोस्ट टाकत असतात. मात्र या पोस्ट टाकण्यामागे यूजर नक्की मानसिकता काय असते, याचा विचार तुम्ही केला आहे का? फेसबुकवर चांगल्या पोस्ट टाकण्यामागे ईर्षा किंवा असूया कारणीभूत असल्याचा दावा नव्या संशोधनात करण्यात आला आहे. अशा पोस्टमुळे यूजरच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचा इशाराही संशोधकांनी दिला आहे. कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाच्या संशोधकांनी हा निष्कर्ष काढला असून, तो"इन्फर्मेशन सिस्टिम्स रिसर्च' या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

फेसबुक यूजर्स त्यांना भावलेल्या, दुसऱ्यांना सांगाव्या वाटतात अशा अनेक पोस्ट टाकत असतात. मात्र या पोस्ट टाकण्यामागे यूजर नक्की मानसिकता काय असते, याचा विचार तुम्ही केला आहे का? फेसबुकवर चांगल्या पोस्ट टाकण्यामागे ईर्षा किंवा असूया कारणीभूत असल्याचा दावा नव्या संशोधनात करण्यात आला आहे. अशा पोस्टमुळे यूजरच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचा इशाराही संशोधकांनी दिला आहे. कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाच्या संशोधकांनी हा निष्कर्ष काढला असून, तो"इन्फर्मेशन सिस्टिम्स रिसर्च' या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. संशोधकांनी जर्मन युनिव्हर्सिटीतील जवळपास दोन हजार यूजर्सच्या फेसबुकवरील पोस्टचे निरीक्षण केले. प्रमुख संशोधक ईसाक बेनबासात म्हणाले,""यूजर्सच्या फेसबुकवरील स्वतःचीच आरती ओवाळणाऱ्या पोस्टमुळे असूया आणि स्वतःलाच महत्त्व देण्याचे दुष्टचक्र सुरू होते. इतर यूजर्सशी तुलना केल्यामुळे त्यांच्यात असमाधानाची भावना निर्माण होते. त्यातूनच स्वतः सर्वोत्तम असल्याच्या पोस्ट टाकण्यासाठी ते प्रेरित होतात. फेसबुक स्वत:च्या आयुष्यातील प्रसंग आणि छायाचित्रे शेअर करण्यासाठीच आहे. त्यामुळे हे थांबविताही येणार नाही. मात्र यूजर्सनी त्याचा आरोग्यावर होणारा परिणामही समजून घ्यावा. सोशल मीडियाच्या अति वापरामुळे नैराश्‍य, चिंतेसारखे मानसिक आजार जडत असल्याचे म्हटले जाते. मात्र त्याचा थेट संबंध उलगडण्यात आम्हाला यश आलेले नाही.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook posts the envy transmitted