Facebook Secret Feature : आता नो चिटींग! चॅटचा स्क्रिनशॉट घेतला तरी येईल नोटीफिकेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Facebook Secret Feature : नो चिटींग! चॅटचा स्क्रिनशॉट घेतला तरी येईल नोटीफिकेशन

Facebook Secret Feature : नो चिटींग! चॅटचा स्क्रिनशॉट घेतला तरी येईल नोटीफिकेशन

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आज अनेक लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. लोक संवाद साधण्यासाठी अनेक सोशल मीडियाचा वापर करतात. यामध्ये मेटाचे फेसबुक आणि त्याचे मेसेंजर अॅप खूप लोकप्रिय आहे. या अॅप्समध्ये अनेक फीचर्स आहेत ज्यांची माहिती सर्वांनाच नाही. फेसबुक मेसेंजरचे (Facebook Messenger) हे सीक्रेट कन्वर्सेशन (Secret Conversation) असेच एक फिचर आहे.

हेही वाचा: WhatsAppवर पाठवू शकता 2GBपर्यंतच्या फाईल, फक्त 'या' यूजर्सला वापरता येणार फिचर

फेसबुकचे सीक्रेट कन्वर्सेशन फीचर काय आहे?

Facebookचे सीक्रेट कन्वर्सेशन एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहे. या फीचरचा वापर करून युजर्स इतर कोणी आपले मेसेज वाचेल यांची चिंता न करता चॅट करू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, तो एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असल्याने, तुमचा संदेश कोणीही वाचू शकत नाही.

फेसबुकसुद्धा तुमचे मेसेज वाचू शकत नाही. तसेच सिक्रेट कॉन्व्हर्सेशनमध्ये तुम्हाला डिसपिअरिंग मेसेजेसचे फीचर उपलब्ध आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही ठराविक कालावधीसाठी मेसेज पाठवू शकता आणि ठराविक वेळेनंतर हा संदेश आपोआप डिलीट होतो.

त्याच वेळी, प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर अॅड झाले आहे, ज्यामुळे जर दुसरा यूजर तुमच्या मेसेजचे स्क्रीन शॉट घेत असेल तर तुम्हाला एक सूचना मिळेल. सीक्रेट कन्वर्सेशन फक्त मेसेंजर मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे. ते वेब व्हर्जनवर आढळणार नाही. हे फिचर कसे काम करते जाणून घेऊ या.

हेही वाचा: लवकरच येतेय Mahindra ची स्वस्त इलेक्ट्रिक कार; काय असेल किंमत?

मेसेंजरवर सीक्रेट कन्वर्सेशन फिचर कसे वापरावे (How to have a secret conversation on messenger)

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये मेसेंजर अॅप उघडावे लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला कंपोज बटणावर क्लिक करावे लागेल, जे मेसेंजरमध्ये उजव्या बाजूला असेल.

  • तुम्ही येथे पोहोचताच एक टॉगल बटण दिसेल, तुम्हाला ते ऑन करावे लागेल.

  • हे टॉगल ऑन करताच मेसेंजर तुम्हाला एखाद्या व्यक्ती निवड करायाला सांगेल ज्यांनी तुम्ही मेसेज करू इच्छित आहात.

  • आपण ज्या व्यक्तीशी सीक्रेट कन्वर्सेशन सुरू करू इच्छिता त्याच्या नावावर क्लिक करणे आवश्यक आहे. यामुळे फेसबुक मेसेंजरवर तुमच्या दोघांमध्ये सीक्रेट कन्वर्सेशन सुरू होईल.