Facebook Users : जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या फेसबुकवर; झुकरबर्गने हे कसं साध्य केलं ?

जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फेसबुकच्या वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे.
Facebook Users
Facebook Users sakal

मुंबई : जगभरात फेसबुक वापरकर्ते वाढत आहेत. डिसेंबर 2022 मध्ये, सरासरी दोन अब्ज लोकांनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. हे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश आहे.

जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या फेसबुकवर आहे, वादानंतरही त्यांची क्रेझ वाढत आहे. अनेक दिवसांपासून अडचणींचा सामना करणाऱ्या फेसबुकसाठी दिलासा देणारी ही बातमी आहे. हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

Facebook Users
Comet in Sky : आज आकाशात दिसणार धुमकेतू; कधी आणि कसा पाहाल ?

जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फेसबुकच्या वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये, जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येने हा प्लॅटफॉर्म वापरला आहे.

अलीकडे कंपनी तोट्यात होती. प्लॅटफॉर्मवर जाहिराती मिळणेही कमी झाले होते आणि खर्चही वाढत होता. यावर उपाय म्हणून मेटामध्ये 11,000 कर्मचाऱ्यांची छाटणीही करण्यात आली. अशा परिस्थितीत मेटा वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे नवीन आशा निर्माण झाली आहे.

खर्चात वाढ आणि जाहिराती न मिळाल्याने कंपनीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्याचवेळी त्याच्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळाली. मात्र, कंपनीने खर्च कमी करण्यावर भर दिला.

सरासरी दोन अब्ज युजर्स फेसबुक वापरत आहेत. कंपनीला गेल्या वर्षी पहिल्यांदाच तोटा सहन करावा लागला आहे.

झुकरबर्गच्या घोषणेमुळे शेअर्समध्ये उसळी

मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी 2023 हे वर्ष 'कार्यक्षमतेचे वर्ष' म्हणून घोषित केले आहे. यानंतर काही तासांतच कंपनीच्या शेअर्समध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

काटकसर करण्यावर भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. 2022 मध्ये, कंपनीच्या कमाईत पहिल्यांदा घट झाली. यावर झुकरबर्ग म्हणाले की, आता आपण वेगळ्या वातावरणात आहोत.

Facebook Users
Virtual Autism : गॅजेट्स वापरण्यात हुशार आहे मूल ? पालकांनो, आत्ताच व्हा सावध !

११ हजार कर्मचाऱ्यांचा रोजगार गेला

व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मालकी असलेल्या मेटा या कंपनीनेही गेल्या वर्षी आपले कर्मचारी कमी केले आहेत. 11,000 लोकांना काढून टाकून, कंपनीने सुमारे 13 टक्के कर्मचारी कमी केले आहेत.

झुकेरबर्गने सांगितले की, गेल्या वर्षी त्याचे 4.6 बिलियन डॉलर (सुमारे 37,635 कोटी रुपये) नुकसान झाले होते, ज्यामुळे त्याचा नफा अर्धा झाला होता.

डिसेंबरमध्ये वापरकर्ते वाढले

कंपनीने उचललेल्या पावलांमुळे डिसेंबरपर्यंत तीन महिन्यांची कमाई $32.2 (सुमारे 2,63,545 कोटी रुपये) होती, जी मागील वर्षाच्या तुलनेत 4 टक्के कमी होती. मात्र, तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा कंपनीची कामगिरी चांगली झाली आहे.

हे गेल्या वर्षी पहिल्यांदा घडले जेव्हा फेसबुकवर दैनंदिन सक्रिय वापरकर्त्यांची संख्या कमी झाली. डिसेंबर 2022 मध्ये, त्याच्या दैनंदिन सक्रिय वापरकर्त्यांच्या संख्येत 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com