आता फेसबुकवरच शोधा नोकरी..

facebook job
facebook job
Updated on

कॅलिफोर्निया - फेसबुकवर न्यूज फिड, ब्रेकिंग न्यूज या आता यूझर्ससाठी नेहमीच्या गोष्टी आहेत. परंतु, आता  'फेसबुक'चा वापर नोकरी शोधण्यासाठीही देखील करता येणे शक्य होणार आहे. 

पहिल्या टप्प्यात अमेरिका आणि कॅनडामधील यूजर्ससाठीच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, येत्या काही दिवसांमध्ये अन्य देशांमध्येही ही सूविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे.

नोकरी शोधण्यासाठी सध्या लिंक्डइन किंवा मॉन्स्टर डॉट कॉम या सारखी संकेतस्थळांचा  वापर जास्त आहे. त्याएवजी फेसबुकवरच नोकरी शोधण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा फेसबुकचा मानस आहे.

असे असले तरी, फेसबुकवर यूझर्स आपली वैयक्तिक माहिती किंवा काही खासगी फोटो देखील अपलोड करत असतात. त्यामुळे अशा प्रकारे फेसबुकवर नोकरी शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळे यूजर्सची ही माहिती धोक्यात येणार का, अशी शंका अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. यूझर्सना नव्या सुविधा उपलब्ध करून देताना त्यांची वैयक्तिक माहिती पणाला लावणे योग्य आहे का..? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com