न्यू मेक्‍सिकोत फेसबुक उभारणार नवे डेटा सेंटर

वृत्तसंस्था
शनिवार, 17 सप्टेंबर 2016

डेटा सेंटर म्हणजे काय? 
डेटा सेंटर म्हणजे एखाद्या संकेतस्थळाची माहिती साठविण्याचे आणि माहितीवर प्रक्रिया करण्याचे प्रमुख केंद्र. डेटा सेंटरचे प्रमुख काम हे माहितीची देवाणघेवाण आणि माहिती साठवणे हे असते. सर्वसाधारणपणे एका मोठ्या कंपनीच्या डेटा सेंटरला एका लहान गावाला लागेल एवढी वीज आवश्‍यक असते. डेटा सेंटरमध्ये मोठमोठाल्या कपाटांमध्ये डिव्हाईस ठेवलेली असतात. तसेच ही सारी डिव्हाईसेस परस्परांना जोडणाऱ्या अनेक तारा (वायर) असतात.

मेन्लो पार्क (कॅलिफोर्निया) - लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने आपल्या वाढत्या युजर्सची संख्या लक्षात घेत न्यू मेक्‍सिकोमधील उताह शहरात नवे डेटा सेंटर उभारणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. 

या संदर्भात फेसबुकच्या आधिकाऱ्यांची एक वर्षापूर्वी मेक्‍सिकोचे गर्व्हनर सुसना मार्टिनेझ यांच्यासोबत एक बैठक झाली होती. याबाबत बोलताना मार्टिनेझ म्हणाल्या, "उताह या गावात हे डेटा सेंटर सुरू झाल्याने पुन्हा एकदा स्पर्धा सुरू होत आहे. मेक्‍सिकोच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात बळकटी आणण्यासाठी ही चांगली योजना आहे. न्यू मेक्‍सिको मधील सर्व राजकीय नेते तसेच लॉस लुनास प्रांतातील स्थानिक नेते यांनी या प्रकल्पाची मागणी लावून धरल्याने कर आकरणी विषयी निश्‍चित धोरण ठरवता आले.‘ 

डेटा सेंटर सुरू करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे क्‍लाऊड कम्प्युटिंगद्वारे आर्थिक भरभराट करणे. मात्र यामध्ये स्थानिकांचे प्रमाण कमी आहे. तज्ज्ञांच्या मते, या बांधकामासाठी सौर उर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार असून, या डेटा सेंटरच्या उभारणीसाठी 1.8 अब्ज डॉलर खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या तात्पुरत्या कामासाठी 300 जणांना तर 50 जणांना कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध होणार आहे. या डेटा सेंटरची उभारणीचे पुढील महिन्यात सुरू होणार असून प्रत्यक्ष ऑनलाइन कामाची सुरवात 2018 पर्यंत सुरू होईल. 

  • हॉर्वल्ड विद्यापीठातील एका खोलीतील एकाच सर्व्हरवर सुरू केले. 2004 साली फेसबुकचे सर्वप्रथम काम सुरू झाले.
  • फेसबुकचे स्वतंत्र असे पहिले स्वत:चे डेटा सेंटर प्रिनविले ओरेगोन येथे नोव्हेंबर 2010 मध्ये सुरू झाले.
  • प्रिनविले येथील डेटा सेंटर 3,07,000 स्क्वेअर फूट क्षेत्रात असून हे केंद्र दोन वॉल मार्ट स्टोअरपेक्षा हे मोठे आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook will have its new data center in New Mexico