आता 'फेसबुक लाईव्ह'मध्ये हिंसेवर 'बॅन'; नव्याने आखली योजना!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 मे 2019

  • फोटो आणि व्हिडीओ विश्लेषण तंत्रज्ञानाच्या सुधारणेसाठी काम
  • दहशतवादाला दुजोरा देणाऱ्या युजर्सचे अकाउंट फेसबुक करेल बॅन
  • द्वेष पसरविणारे फेसबुक ग्रुप्सही धारेवर

फेसबुकने हिंसेची लाईव्ह स्ट्रिमींग आणि त्याची शेअरींग थांबविण्यासाठी 'वन स्ट्राईक पॉलिसी' बनवली आहे. कंपनीने न्यूझीलंडचे क्राइस्ट चर्च येथे हल्ला केलेल्या दहशतवाद्याद्वारे लाईव्ह स्ट्रिमींग केली गेली होती, त्यावरुन हा निर्णय घेतला आहे. फेसबुकचे 'इंटीग्रिटी'चे वीपी गाय रोसेन यांनी सांगितले की, 'जे लोक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर फेसबुक लाईव्ह स्ट्रिमींग फीचरचा दुरुपयोग केल्यामुळे बंदी आणली जाईल. जर एखाद्या युजरने हिंसक व्हिडीओची लाईव्ह स्ट्रिमींग केली असेल तर त्यानंतर तो युजर लाईव्ह स्ट्रिमींगचा वापर करु शकणार नाही.'

रोसेन यांनी सांगितले की, 'मार्च मध्ये क्राइस्ट चर्चवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची लाईव्ह स्ट्रिमींग केली गेली होती. यासोबतच या व्हिडीओला खूप युजर्सनी शेअरही केले होते. यामुळे आमचे प्रयत्न राहील की, आम्ही आमच्या सर्विसला काही मर्यादा घालून देऊ. जेणेकरुन फेसबुकवर नकारात्मक आणि उत्तेजनक डेटा पसरवू शकणार नाही. यासाठीच वन स्ट्राईक पॉलिसी लागू केली जात आहे. फेसबुकने लाईव्ह स्ट्रिमींग हे फीचर युजर्सनी आपल्या फ्रेंड्स, फॅमिलीबरोबर घालविलेले क्षण किंवा कोणत्याही गोष्टीबाबत जनजागृती करता यावी यासाठी उपलब्ध करुन दिले होते. पण त्याचा वापर आता सामाजिक वातावरण भडकविण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे आम्हाला आता लाईव्ह स्ट्रिमींग वापरकर्त्यांसाठी मर्यादा आणणे गरजेचे झाले आहे.'  

आर्टिफिशियल इंटेलीजेंसचा वापर करत आहे फेसबुक: 
ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलैंड येथे सोशल मिडीयाद्वारे द्वेष पसरविणारे ग्रुप्स ओळखून त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हटविण्यासाठी फेसबुक आर्टिफिशियल इंटेलीजेंसचा वापर करत आहे. असे ग्रुप्स फेसबुकची कोणतीही सेवा वापरु शकणार नाही. फेसबुकने श्वेत राष्ट्रवाद आणि श्वेत कुटीरतावादाला समर्थन करणाऱ्या डेटालाही बॅन करेल. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अशा प्रकारच्या डेटावर बॅनची कारवाई पुढच्या आठवड्यापासून केली जाईल. 

फेसबुकने फोटो आणि व्हिडीयो विश्लेषण तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी अमेरिकेतील तीन विश्वविद्यालयांशी करार केला आहे. यासाठी फेसबुक 75 लाख डॉलर (51 करोड रुपये) खर्च करत आहे.

'वन स्ट्राईक पॉलिसी' बाबत अधिक वाचा फेसबुकच्या अधिकृत साईटवर -
Protecting Facebook Live from Abuse and Investing in Manipulated Media Research


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebooks One Strike Policy to Stop Violent Live Streaming