
मार्केटमध्ये एका नव्या स्कॅमचा सुळसुळाट आहे
या मालवेअरचे नाव लुमा स्टीलर’ आहे
हा बनावट कॅप्चा कोड स्कॅम आहे
Captcha Scam : भारतात सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा प्रकार सुरू केला आहे ज्यामुळे इंटरनेट वापरकर्त्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. नॉर्मल दिसणारे कॅप्चा कोड आता धोकादायक मालवेअरचा पसरवण्यासाठी वापरले जात आहेत. एक चुकीचे क्लिक आणि तुमचा फोन किंवा लॅपटॉप, कम्प्युटर ‘लुमा स्टीलर’सारख्या मालवेअरच्या तावडीत सापडू शकतो ज्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती, बँकची माहिती आणि पासवर्ड चोरले जाऊ शकतात.