Fastag scam : फूड ब्लॉगरची गाडी घरात पार्क अन् टोल झाला कट; फास्टॅगचा नवा फ्रॉड आला समोर

Fastag Toll Fraud : फास्टॅग तंत्रज्ञानामुळे टोल वसुली सोपी झाली असली तरी त्याचा गैरफायदा घेत काही घोटाळे समोर येत आहेत. सोशल मीडिया इंफ्लुएंसर मनोज शिंगुस्ते यांच्या प्रकरणातून फास्टॅग क्लोनिंग, फेक नंबर प्लेट आणि टोल कर्मचार्‍यांच्या गैरप्रकाराचे प्रकरण समोर आले आहे.
Fastag Toll Fraud social media influencer manoj shinguste
Fastag Toll Fraud social media influencer manoj shingusteesakal
Updated on

Fastag Toll Scam : देशभरात फास्टॅग तंत्रज्ञानाने टोल वसुली सोपी आणि वेगवान केली आहे, पण याच तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत काहीजण मोठ्या घोटाळ्यात गुंतले आहेत, अशी गंभीर प्रकरणे समोर येत आहेत. मनोज शिंगुस्ते यांची कहाणी याचे मोठे उदाहरण आहे, ज्यांनी अशा घोटाळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शिंगुस्ते हे एक सोशल मीडियावर खूप फेमस फूड ब्लॉगर आहेत. त्यांनी फेसबुकवर या घोटाळ्याची माहिती आणि टोल कट झालेले स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. जाणून घेऊया नेमकी घटना काय आहे.

गाडी घरात, पण टोल कट

मनोज शिंगुस्ते यांनी सप्टेंबर 2024 मध्ये असे मेसेज मिळायला सुरुवात झाली की त्यांच्या गाडीवर टोल कट झाला आहे, पण तेव्हा त्यांची गाडी त्यांच्या घरासमोर पार्क होती. सुरुवातीला तांत्रिक चुकांमुळे असे घडत असेल, असे वाटले, पण नंतर ही समस्या सतत होऊ लागली. विशेष म्हणजे, त्यांनी जेव्हा फ़ास्टॅग रिचार्ज केला तेव्हाच हे मेसेज येत होते.

शिंगुस्ते यांनी बँक, NHAI, आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या. पण त्यांना कुठेच ठोस उत्तर मिळाले नाही. बँकांकडून फक्त "तांत्रिक अडचण आहे" असे सांगितले जात होते, तर NHAI ने त्यांना त्यांच्या बँकेकडे जाण्यास सांगितले. फ़ास्टॅगसाठी भारतात कोणतेही अधिकृत कार्यालय नसल्यामुळे, थेट संपर्काची सुविधाही उपलब्ध नाही.

screenshot shared by social media influencer manish shinguste on facebook.
screenshot shared by social media influencer manish shinguste on facebook.esakal
Fastag Toll Fraud social media influencer manoj shinguste
New Rules From 2025 : व्हॉट्सअ‍ॅप सपोर्टपासून UPI लिमिटपर्यंत! जानेवारी 2025पासून भारतात लागू झालेत 'हे' 5 नवे नियम

घोटाळ्याची शक्यता काय आहेत?

शिंगुस्ते यांच्या अनुभवातून काही संभाव्य शक्यता पुढे आल्या आहेत.

1. फेक नंबर प्लेट: कोणीतरी त्यांच्या गाडीची नंबर प्लेट नकली बनवून वापरत आहे.

2. टोल कर्मचार्‍यांचा गैरप्रकार: टोल नाक्यावरचे कर्मचारी त्यांच्या फास्टॅग नंबरचा वापर करून अन्य वाहनांना टोलमुक्त करत आहेत.

3. फास्टॅग क्लोनिंग: चॅसिस नंबरच्या आधारे त्यांचा फास्टॅग क्लोन केला गेला असावा.

4. मोठा स्कॅम: हजारो वाहनधारकांवर हा प्रकार होत असेल, तर दर महिन्याला करोडो रुपये फसवले जाऊ शकतात.

Fastag Toll Fraud social media influencer manoj shinguste
Mobile Recharge Fraud : अलर्ट! सुरू झालाय मोबाईल रिचार्जचा नवा फ्रॉड; तुम्ही मिनिटात अडकू शकता जाळ्यात, नेमकं प्रकरण वाचा

काय उपाय करावे?

या प्रकरणाने फास्टॅग वापरकर्त्यांसाठी काही महत्त्वाचे प्रश्न उभे केले आहेत.असे मेसेज मिळाल्यास त्वरित तपास करा आणि संबंधित बँक किंवा NHAI कडे तक्रार करा. शक्य असल्यास पोलिसांकडे तक्रार दाखल करा. सरकारने फास्टॅग व्यवस्थापनासाठी विशेष कार्यालये उघडणे आणि संपर्क क्रमांक सक्षम करणे आवश्यक आहे.

सरकार आणि नागरिकांसाठी आवाहन

या प्रकाराने फास्टॅग तंत्रज्ञानेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सरकारने यावर त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे. तसंच, नागरिकांनीही सतर्क राहून अशा प्रकरणांमध्ये तक्रार करणे आवश्यक आहे.

शिंगुस्ते यांचे अनुभव हे सर्वसामान्यांसाठी धडा आहे. आपल्या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवणे आणि वेळेत तक्रार करणे ही काळाची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com